HW News Marathi
महाराष्ट्र

तीन चाकी कुठे न्यायची हे चालक नाही, मागे बसलेली सवारी ठरवते !

मुंबई | “महाविकासाआघाडीच्या ऑटो रिक्षाचं स्टिअरिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हातात आहे. पण कुठे जायचं हे मागे बसलेले ठरवतात”, असा टोला विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. “तीन चाकी ऑटोरिक्षा कुठे न्यायची हे चालक नाही, त्यात बसलेली सवारी ठरविते”, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बोचरा टोला लगावला आहे. त्याचप्रमाणे, महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत फडणवीस बोलत होते. यावेळी, देवेंद्र फडणवीसांनी सर्वांच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शुभेच्छाही दिल्या.

“राज्यातील महाविकासाआघाडीचे सरकार हे जनतेने निवडून दिलेले सरकार नाही. हे विश्वासघाताने आलेले सरकार आहे. आम्ही आमची विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली आहे. तुम्ही चुकत असाल तर तुम्हाला तुमच्या चुका दाखवून देणे हे आमचे कामच आहे. आम्हाला हे सरकार पाडण्यात काहीही रस नाही. पण तुम्ही किमान सरकार चालवून तर दाखवावे. तुम्हीच एकमेकांच्या तंगड्या तोडायला सक्षम आहात”, अशी टीका देखील देवेंद्र फडणवीसांनी महाविकासआघाडी सरकारवर केली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेला महाविकासआघाडीकडून प्रत्युत्तर येणार का ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राणा दाम्पत्यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा नाही; 29 तारखेपर्यंत कारागृहातच रहावे लागणार

Aprna

‘ताई, मी तुम्हाला दीर्घायुष्य चिंतितो’, फडणवीसांकडून पंकजा मुंडेंना शुभेच्छा !

News Desk

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या दोन्ही पुत्रांवर गुन्हा दाखल; शरद पवारवर केलेले ‘ते’ प्रकरण भोवले

Aprna