HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीसांनी ‘ओबीसीं’चे नेतृत्व करावे!

लोणावळा | मराठा आरक्षणानंतर आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही तापला आहे. अशात आता ओबीसीचे राजकीय आरक्षण कायम राहण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाचे नेतृत्व करावे, असे आवाहन अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी केले. सर्व श्रेय त्यांनी घ्यावे, पण आमचे आरक्षण वाचवावे, असेही ते म्हणाले आहेत.

ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपचे राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन सुरू असताना भुजबळ यांनी फडणवीस यांना ओबीसी समाजाचे नेतृत्व करण्याचे आवाहन लोणावळा येथील ‘ओबीसी-व्हीजेएनटी न्याय हक्क समिती’च्या चिंतन बैठकीत केले.

काय म्हणाले छगन भुजबळ?

भुजबळ म्हणाले की, ‘‘पक्ष कोणताही असला तरी त्याने काही फरक पडत नाही, ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी भांडणाऱ्या सर्वांचे आम्ही स्वागत करतो. फडणवीस यांनी ओबीसी समाजाचे नेतृत्व करावे. सर्व श्रेय त्यांनी घ्यावे, पण आमचे आरक्षण वाचवावे.’’ २०१६ मध्ये देशातील सर्व ओबीसींची माहिती संकलित करून केंद्राकडे देण्यात आली होती. ही माहिती न्यायालयात का सादर केली गेली नाही? केंद्रात भाजपचे सरकार असल्याने मी फडणवीस यांना ओबीसी समाजाचे नेतृत्व करण्याचे आवाहन केले आहे, असेही भुजबळ यांनी नमूद केले.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

वडेट्टीवार म्हणाले की, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत राहिले तर ओबीसी आरक्षणाचा मूळ मुद्दा बाजूला राहील. पक्षाचे विचार बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रितपणे आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी लढायला हवे. ज्या समाजाने आपल्याला मोठे केले त्या समाजासाठी एक झाले पाहिजे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंदू सणांच्या वेळी ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?; आशिष शेलारांचा सवाल

News Desk

ऑपरेशन कमळाबाबत काही सांगता येत नाही पण… – प्रसाद लाड

News Desk

महाविकास आघाडी सरकारमध्ये आपली जागा फक्त खलिता वाहणाऱ्या काशिदाची; साटमांचा राऊतांना टोला

Aprna