HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

तुमच्यात हिंमत नसेल तर आम्हाला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो, फडणवीसांनी सरकारला सुनावलं!

मुंबई | ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात रोज नव्या चर्चांना वळण येतं, राज्यातील वातावरण खूपच गढूळ झालं आहे. याच मुद्यावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका चांगलीच रंगलेली सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य सरकारला सुनावलं आहे.

जाणीवपूर्वक ओबीसींना राजकीय आरक्षणच द्यायचं नाहीये. उठसुट तर केंद्राकडे बोट दाखवतात. अरे नसेल तुमच्यात हिंमत तर आम्हाला सांगा, आम्ही जर चार महिन्यात. हो आमचं राज्य असतं, तर आम्ही चार महिन्यात ओबीसींचा एम्पिरिकल डेटा तयार करुन जर ओबीसींचं आरक्षण पूर्ववत आणलं नाही तर पदावर देखील राहणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आज(२४जून) भाजप पक्षाची प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण परत मिळवण्याच्या मुद्यावरून आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं समजतं आहे. ज्यावेळी हायकोर्टात आरक्षणाचा विषय मांडायला हवा होता. त्यावेळी हायकोर्टात तारखा घेत होते आणि मंत्री रस्त्यावर मोर्चा काढत होते. एवढंच नाहीतर आजही पाहा इम्पेरिकल डेटा तयार करत नाहीयेत, तर त्याऐवजी यांचेच कार्यक्रम, मोर्चे सुरू असल्याचं फडणविसांनी सांगितलं.

तसेच भाजप २६ तारखेचं आंदोलन करुन शांत बसणार नाही. ओबीसींचं राजकीय आरक्षण जोपर्यंत परत येणार नाही. तोपर्यंत या सरकारला आम्ही झोपू देणार नाही. आता हा संघर्ष अटळ आहे. तुम्हाला नसेल जमत तर मदत मागा, आम्ही मदत करायला तयार आहोत. ओबीसींसाठी संघर्ष करु. पण जर ओबीसींना फसवाल तर भाजप शांत बसणार नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Related posts

मोठी बातमी! महाराष्ट्रातील लॉकडाऊनवर २ दिवसांत निर्णय होणार

News Desk

सदाभाऊंचे मंत्रिपद कायम

News Desk

रेमडेसिवीरची प्रचंड टंचाई आणि काळाबाजार, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk