HW News Marathi
देश / विदेश

फडणवीसांचा दिल्लीत मेट्रोने प्रवास पण टीका मुंबईच्या मेट्रोवर

मुंबई | मुंबईतील मेट्रो हा राजकीय वर्तृळातील वादाचाच विषय बनला आहे. महाविकासआघाडी सरकारवर विरोधी पक्ष असलेला भाजप या मुद्द्यावरुन कायमच टीका करताना दिसत आहे. अशात काल (२७ जानेवारी) विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत मेट्रोने प्रवास केला. या प्रवासाचा त्यांनी फोटो सोशल मिडीयावर टाकला असून सरकारवर टीकाही केली आहे. या प्रवासादरम्यानचा एक फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी कारशेडच्या वादामुळे रखडलेल्या मेट्रो-३ च्या मुद्द्यावरुन महाविकासआघाडी सरकारला चिमटाही काढला आहे.

“मी आज दिल्ली विमानतळावर परत येताना मेट्रो रेल्वेने प्रवास केला. नेहमीच्या रस्ते मार्गापेक्षा हा प्रवास अत्यंत कमी वेळेत झाला. मुंबईत मेट्रो-3 मार्गाने मी विमानतळापर्यंत असा कधी प्रवास करु शकेन? महाविकासआघाडी सरकारने कारशेडच्या मुद्द्यावरुन घातलेला गोंधळ पाहता त्याची शाश्वती वाटत नाही”, अशी टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंजाबी सुप्रसिद्ध गायक आणि काँग्रेस नेते सिद्ध मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या

Aprna

गोव्यात सोपटेंनी मराठी तर शिरोडकरांनी कोकणी भाषेतून घेतली शपथ

News Desk

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून अटक

News Desk