HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीस आधी शरद पवारांच्या घरी, आज थेट एकनाथ खडसेंच्या मुक्ताईनगरमध्ये, काय आहे कारण?

जळगाव | राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सध्या दौऱ्यावर आहेत. वादळाने ज्या भागाला तडाखा बसला त्या भागाची पाहणी देवेंद्र फडणवीस करत आहेत. दरम्यान, काल (३१ मे) देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज थेट ते राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथे गेले आहेत.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज.(१ जून) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी मुक्ताईनगर येथून केली आहे. दरम्यान, फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कोथळी येथील घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी माजीमंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते. या ठिकाणी त्यांनी एकनाथ खडसेंच्या सून तथा भाजप खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. फडणवीसांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात गेल्या आठवड्यात मान्सूनपूर्व वादळी पावसाने मोठे थैमान घातले. यात केळी बागांसह घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. दौऱ्याची सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे खडसेंच्या घरी सदिच्छा भेट दिली.

खडसे-फडणवीस यांच्यात राजकीय वैर

माजीमंत्री एकनाथ खडसे हे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आपल्याला भाजप पक्ष सोडावा लागला, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. त्यानंतर फडणवीस यांनी आरोपाचे खंडन केले होते.

मात्र, नंतर दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर सातत्याने आरोप-प्रत्यारोप केले जातात. अशा परिस्थितीत आज फडणवीस यांनी त्यांच्या घरी सदिच्छा भेट दिल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.

खडसेंच्या बालेकिल्ल्यात दिलेल्या भेटीने उंचावल्या नजरा-

दोन्ही नेत्यांमध्ये हाडवैर असताना फडणवीस यांनी खडसेंच्या बालेकिल्ल्यात दिलेली सदिच्छा भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या भेटीत राजकीय गणिते ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे. खडसेंनी पक्ष सोडल्यानंतर डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहेत. ‘मिशन लोटस’चा हा एक भाग असल्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस शरद पवारांच्या भेटीला

विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक इथे जाऊन फडणवीस शरद पवारांना भेटले. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते श्री शरद पवारजी यांची त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात सायबर इंटिलिजन्स युनिट उभारणार

Manasi Devkar

गोव्यात आघाडी सरकारची उभारणी करण्यासाठी शरद पवारांना मध्यस्थीसाठी विचारणार – दीपक केसकर

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात ३ हजार २७६ ग्रामपंचायती जिंकल्या – जयंत पाटील

News Desk