HW News Marathi
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खास शुभेच्छा!

मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज (२७ जुलै) वाढदिवस आहे. एरवी राजकारणात विरोधी पक्ष एकमेकांवर टीका करताना आपल्याला दिसतात. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसासाठी खास ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री सध्या पूर्वपरिस्थितीचा आढावा घेत दौऱ्यावर आहेत. अश्या या प्रसंगी वाढदिवस साजरा करू नये असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य चिंतितो

दोन विरोधी पक्षांमध्ये जिथे नेहमी वाद दिसत असतात, तिथेच आज वाढदिवसानिमित्त देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विट करत दीर्घायुष्याचा शुभेच्छा दिल्या आहेत. ‘महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !मी त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य चिंतितो !’, हे ट्विट करत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

गणपतीला तब्बल 61 किलोंचा मोदक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पुण्यात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो – हे यांनी शिवसेना कार्यकर्त्यांसह पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपतीला तब्बल 61 किलोंचा मोदक अर्पण केला आहे. यावेळी गोऱ्हे यांनी शिवसेना कार्यकर्त्यांसह महाआरती देखील केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 61 वर्षे पूर्ण केल्याबद्दल शिवसेना पुणे शहराच्यावतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या, त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभाव, तसेच कोरोना व नैसर्गिक आपत्तीविरूद्ध लढण्याचे बळ मिळावे आणि पीडितांची सेवा करण्याचा आशीर्वाद मिळावा अशी प्रार्थना देखील करण्यात आली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्रालयात मिटिंग घेऊन अन्वय नाईक प्रकरण दाबण्यात आलं, गृहमंत्र्यांचे मोठे वक्तव्य

News Desk

नागरिकांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे

News Desk

हसन मुश्रीफ यांच्या पाठीशी गृहराज्य मंत्री; राष्ट्रवादीची कोल्हापुरात निदर्शने!

Ruchita Chowdhary