HW News Marathi
महाराष्ट्र

मनसुख हिरेन प्रकरण: वसई-विरार मध्ये कुठलाही गुन्हा घडला की माझा संबंध जोडणार का? – धनंजय गावडे

मुंबई | मनसुख हिरेन प्रकरणात माझा काही संबंध नसून बिल्डराला वाचविण्यासाठी हे रचलेले षडयंत्र आहे, असा आरोप वसईतील शिवसेनेचे माजी नगरसेवक धनंजय गावडे यांनी केला आहे. मनसुख हिरेन यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन विरार येथे आढळले होते. या प्रकरणात धनंजय गावडे यांचा हात असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (९ मार्च) सभागृहात सांगितले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना गावडे यांनी हे सर्व आरोप बिनबुडाचे आणि निराधार असल्याचे सांगितले.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके असलेले वाहन सापडले होते. या वाहनाचे मालक मनुसख हिरेन यांची चौकशी सुरू असताना हिरेन यांचा मृतदेह ठाणे खाडीत आढळला होता. हिरेन हे मृत्यूपूर्वी विरारला गेले होते असे त्यांच्या मोबाईलच्या लोकेशनवरुन आढळले होते. शिवसेनेचे माजी नगरसेवक धनंजय गावडे नुकतेच वसईत परतले आहे. हिरेन मनसुखानी यांच्या हत्याप्रकरणात गावडे यांचा संबंध असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना सभागृहात केला. यामुळे गावडे यांचे नाव पुन्हा चर्चेत आले होते.

मनसुख हिरेन कोण आहेत ते मला माहित नाही, त्यांचा आणि माझा काहीच संबंध नाही, असे धनंजय गावडे यांनी याबाबत आपली भूमिका मांडताना स्पष्ट केले. मला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिला आहे. त्याची पुढील महिन्यात सुनावणी आहे. त्यावर विपरित परिणाम व्हावा म्हणून गुप्ता नावाच्या बिल्डराच्या सांगण्यावरून हे कुंभाड रचल्याचा आरोप त्यांनी केला. वसई-विरार मध्ये कुठलाही गुन्हा घडला की विनाकारण माझा संबंध जोडणार का?, असा सवालही त्यांनी केला. याबाबत तपास यंत्रणेला जे सहकार्य लागेल ते करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

….जर ही वेळ आलीच तर मग सरकार राहणार नाही!

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावर आमचे समाधान नाही – सुनील तटकरे 

News Desk

‘भाजपला दादर, माहीममध्ये प्रवेश मिळणार नाही!’ सदा सरवणकरांचं मोठं विधान

News Desk