HW News Marathi
महाराष्ट्र

DBT पद्धतीने बांधकाम कामगारांच्या बॅंकेत प्रत्येकी २ हजार रुपये जमा होणार

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामूळे सर्व उद्योग, व्यवसाय हे ठप्प आहेत. याचा सगळ्यात जास्त फटका हा मजूरांना बसला आहे. तसेच, इमारत आणि अन्य कोणतीही बांधकामे ही सुरु नाही आहेत. त्यामूळे बांधकाम कामगारांना अनेक अडचमांनी सामरे जावे लागत असल्याकारणाने, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार व राज्य उत्पादनशुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विचार करुन, या बांधकाम कागारांच्या बॅंक खात्यात २ हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

जे कामगार मंडळाकडे नोंदीत आहेत आणि ते सक्रीय आहेत, अशा कामगारांना हा लाभ मिळणार असल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. DBT पद्धतीने प्रत्येक कामगाराला हे अर्थसहाय्य केले जाणार आहे. कामगारांसाठी ज्या योजना राबवल्या जातात त्यासाठी निधी काढला जातो. या निधीतून हे सहाय्य करण्यात येणार असल्याचेही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वडिलांवरील टीकेला लेकीचं प्रत्युत्तर, पडळकराना थोरातांच्या मुलीचा संस्काराचा टोला

News Desk

आढळराव-पाटील ठाकरे सरकारवर भडकले ! ‘या’गोष्टीचा केला तीव्र शब्दांत निषेध

News Desk

“हे काही रामराज्य आहे का?,” संजय राऊत मोदी सरकारवर संतापले

News Desk