HW News Marathi
महाराष्ट्र

‘पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी धावली दिपाली सय्यद,’ 10 कोटींची मदत!

कोल्हापूर। गेल्या आठवड्यापासून मुसळधार पावसाने राज्यातला वेगवेगळ्या ठिकाणी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला यामुळेच अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली, त्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला मोठा फटका बसला. अतिवृष्टी, पूरपरिस्थिती आणि दरड दुर्घटनेत रायगड, सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये मोठं नुकसान झालं. मोठ्या प्रमाणावर जिवीत आणि वित्त हानी झाली. अनेक संसार उद्धव्स्त झाले. पूरग्रस्त भागाचे राजकीय नेत्यांकडून पाहणी दौरेही सुरु आहेत. यात मराठमोळी दीपाली सय्यदने मोठं दातृत्व दाखवलं आहे.

घरबांधणीसाठी दहा कोटींची मदत

मराठमोठी अभिनेत्री दिपाली सय्यदही पूरग्रस्तांच्या मदतीला पुढे सरसावली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरात नागरिकांचे मोठे नुकसान झालं आहे. अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे. अशा नुकसानग्रस्त लोकांना दिपाली सय्यदने मदतीचा हात दिला आहे. दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने कोल्हापूर, रत्नागिरी रायगड पूरग्रस्त भागातील लोकांच्या पुनर्वसनासाठी त्यांच्या घरबांधणीसाठी दहा कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे.

अभिनेत्री देखील मदतीसाठी पुढे

कोल्हापूरमध्ये पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीमध्ये मदतीचा ओघ सुरु आहे. राजकीय नेते मंडळींकडूनही मदत करण्यात येत आहे. आता यामध्ये अभिनेते आणि अभिनेत्री देखील मदतीसाठी पुढे येत आहेत. दिपाली सय्यद यांनी भुदरगड जिल्ह्यातील भागाचा दौरा करुन पूरग्रस्त नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत. दीपाली सय्यदकने माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, राज्यातील स्थिती भयंकर आहे. पूरग्रस्त बाधितांशी संवाद साधताना त्यांच्या व्यथा जाणून अंगावर काटा येत होता. लोक दुःख सांगताना रडत होते. प्रत्येक घराचं मोठ नुकसान झालं असल्याचे दीपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.

आज दीपाली सय्यद यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी परिसरात पुरामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांच्या घरी भेट देऊन पडझडीची पाहणी केली. पुरात झालेल्या नुकसानीची माहिती देखील त्यांनी घेतली. यावेळी डोळ्यात अश्रू आणून आपली व्यथा सांगणाऱ्या महिलांना त्यांनी आधार दिला. नुकसानग्रस्तांना ट्रस्टच्या माध्यमातून आवश्यक ती मदत केली जाईल देखील त्यांनी यावेळी आश्वस्त केलं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय नाईलाजाने, यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार”

News Desk

‘या’ कारणामुळे आरोह वेलणकर यांना महेश टिळेकरांनी सुनावले!

News Desk

“दादा आता सहन होत नाही”, अजित पवारांनी अबोला धरलेल्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याचा माफीनामा

News Desk