HW News Marathi
महाराष्ट्र

‘पुण्यासाठी काही सूट देता येईल का याबाबत चर्चा सुरु’, गृहमंत्र्यांची माहिती

पुणे। पुणे जिल्ह्यातील निर्बंध शिथील करण्याबाबत निर्णय झालेला नाही. मात्र पुण्यासाठी काही सूट देता येईल का याबाबत चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याबाबत चर्चा करुन पुढील एक दोन दिवसात निर्णय घेतील”, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

याच्याबाबत निर्णय एक- दोन दिवसात

दिलीप वळसे पाटील म्हणाले, “आता जे निर्बंध आहेत, ते निर्बंध शिथील करण्याच्या दृष्टीकोनातून, काल आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. महाराष्ट्रातील 11 जिल्हे लेव्हल 3 मध्ये आहेत. त्यात पुण्याचा समावेश आहे. त्यामुळे अजून निर्बंध शिथील करण्यास मान्यता दिलेली नाही. तथापि, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचं बोलणं झालेलं आहे. त्यामध्ये पुण्याला निर्बंधामध्ये काही सूट देण्याची चर्चा सुरु आहे. याच्याबाबत निर्णय एक- दोन दिवसात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील”

आरोग्य मंत्र्यांची माहिती

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल महाराष्ट्रातील कोरोना निर्बंधांबाबत महत्वाची घोषणा केली. यानुसार 25 जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील करण्यात आले. मात्र, निवडक 11 जिल्ह्यांमधील कोरोना संसर्गाची स्थिती पाहता तेथील निर्बंध काय असणार आहेत. गरज पडल्यास कोरोना नियंत्रणासाठी या ठिकाणी निर्बंध वाढवलेही जातील, असं टोपे यांनी सांगितलं.

व्यापाऱ्यांचा विरोध आहे

ज्या 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम आहेत, त्यामध्ये पुणे जिल्ह्याचा समावेश आहे. पुण्यात लेव्हल तीनचे निर्बंध कायम आहेत. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाला पुण्यातील व्यापाऱ्यांचा विरोध आहे. आम्ही दुकानं, व्यवसाय सुरु करु असा पवित्रा व्यापाऱ्यांनी केला आहे.

2 ते 3 दिवसात निर्णय

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यासाठी काही सूट देता येईल का याबाबत आरोग्य विभागाकडून अहवाल मागवण्यात आल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून पुढील 2 ते 3 दिवसात निर्णय होईल, असंही वळसे पाटील म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतीय विद्याभवन सांस्कृतिक केंद्राची उपमुख्यमंत्र्यांकडून लोकार्पणपूर्व पाहणी

Aprna

डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य! सामनातून भाजपवर निशाणा

News Desk

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात तलाठी संघटना आक्रमक!

News Desk