HW News Marathi
महाराष्ट्र

“काहीही करा, मदत केल्याशिवाय जाऊ नका” चिपळूणच्या महिलेने फोडला मुख्यमंत्र्यांजवळ हंबरडा…!

चिपळूण। तुमच्या दुकानातील सामानाची नासधूस झाली. तुम्ही याची काळजी करू नका. तुम्हाला इजा झाली नाही ना. तुम्ही सर्व सुरक्षित आहात ना. तुमच्या मालाचं बघू, ते आमच्यावर सोडा, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील व्यापाऱ्यांना दिलासा दिला. यावेळी अनेक व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडल्या. एका महिलेने तर मुख्यमंत्र्यांसमोर हंबरडाच फोडला. आम्हाला आश्वासन नको, मदत हवी आहे. आम्हाला सोडून जाऊ नका, आम्हाला मदत करा, अशी वेदनादायी व्यथा या महिलेने मांडली आहे.

व्यापाऱ्याकडून नाराजी

राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण केली. यावेळी चिपळूणमध्ये बाजारपेठा आणि घरं पाण्याखाली गेली असल्याने जनजीवन विस्कळीत झालं. दरम्यान पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी दौरा केला. यावेळी व्यापाऱ्याकडून नाराजी व्यक्त होताना दिसली.

व्यापारी महिलेने मुख्यमंत्र्यांना विनंती

पाहणी दौऱ्यादरम्यान एका व्यापारी महिलेला भावना अनावर झाल्या. झालेल्या नुकसानाची माहिती देताना महिलेला रडू आवरता आलेलं नाही. “दुकान, घरं सगळंच पाण्याने वाहून नेलंय. मुख्यमंत्री साहेब आमदार खासदारांचा 2 महिन्यांचा पगार काढून कोकणाला मदत करा. आम्हाला नुसतं आश्वासन देऊन जाऊन नका,” अशी कळकळीने या व्यापारी महिलेने मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे.

मुख्यमंत्री येणार म्हणून या बाजारपेठेत प्रचंड गर्दी

मुख्यमंत्री चिपळूण च्या बाजारपेठेत पोहोचले. यावेळी त्यांनी गांधी चौकातील दुकानदारांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती जाणून घेतली. मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा थांबून व्यापाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी अनेक दुकानदारांनी पाणावलेल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. मुख्यमंत्र्यांनीही या व्यापाऱ्यांना आणि स्थानिकांचं सांत्वन केलं. मुख्यमंत्री येणार म्हणून या बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती. या प्रसंगी त्यांच्यासोबत परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, मिलिंद नार्वेकर आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलीस बळाचा वापर करून नगरसेवकांवर दबाव आणला जातोय, प्रविण दरेकरांचा गंभीर आरोप  

News Desk

आम्ही तोंड उघडलं तर अमृता फडणवीसांना तोंड लपवायला जागा राहणार नाही, शिवसेना आक्रमक 

News Desk

मुंबईत महानगरपालिकेवर गेल्या २५ वर्षापासून शिवसेनेचा परफेक्ट कार्यक्रम सुरुच, राऊतांचा भाजपला टोला

News Desk