HW News Marathi
महाराष्ट्र

माझ्या बीड जिल्ह्याला बदनाम करु नका; धनंजय मुंडेंची पंकजा मुंडेंवर परखड टीका

बीड | भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यात माफिया राज सुरू असून जिल्ह्यात सामान्य नागरिक तसेच महिला सुरक्षित नाहीत गुन्हेगारीने हैदोस घातला याबाबद राज्यचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री यांना पत्र दिले होते याचे पडसाद सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात जिल्ह्यातील आमदारांनी आपल्या आपल्या मतदार संघात चालत असलेली वस्तुस्थिती मांडण्याचे काम केले तर यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन आमदारांनी ही बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या स्थितीला उजाळा दिला. मात्र याबाबद बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांना ही बाब चांगलीच खटकल्याचे चित्र सध्या पाहवयास मिळत आहे.

धनंजय मुंडे आज बीड दौऱ्यावर असून त्यानी एका कार्यक्रमात आपल्या मनातली खंत व्यक्त केली या या कार्यक्रमात बोलतांना धनंजय मुंडे म्हणले की, ज्याला कुणाला एखादा विषय मांडायचा असतो. मात्र बीड जिल्हा असा बीड जिल्हा तसा असे चालू आहे. ज्या विचारधारेतून चालले तुम्ही बीड जिल्ह्याला बदनाम करू नका. समजा मी धनंजय मुंडे म्हणून काम करत नसेल तर धनंजय मुंडेंला वाट्टेल तसं बदनाम करा. मात्र, बीड जिल्ह्याला बदनाम करू नका. बीड जिल्हा बिहार… बीड जिल्ह्यात मागास म्हणून माझ्या जिल्ह्याची बदनामी करू नका. अशी परखड टीका मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर केली आहे.

सर्वात आधी भारतीय जनता पार्टीने बीड जिल्ह्याची बदनामी केली. माजी पालकामंत्र्यांनी ज्या पद्धतीने पत्र लिहिले खऱ्या अर्थाने बीड जिल्हा इथेच बदनाम झाला. अशी खंत बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राष्ट्रिय कृषी विकास योजना जिल्हा स्तरीय कार्यशाळा कार्यक्रमात बोलतांना मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

पंकजा मुंडेंनी बीडची बदनामी केली

धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांनाही टार्गेट केलं आहे. ज्याला कुणाला एखादा विषय मांडायचा असतो त्यांनी मांडावा. मात्र बीड जिल्हा असा बीड जिल्हा तसा असे चालू आहे. असे बोलून तुम्ही बीड जिल्ह्याला बदनाम करू नका. असा टोला त्यांनी पंकजा मुंडे यांना लगावला आहे. समजा मी धनंजय मुंडे म्हणून काम करत नसेल तर धनंजय मुंडेंला वाट्टेल तसं बदनाम करा. मात्र बीड जिल्ह्याला बदनाम करू नका. बीड जिल्हा बिहार झालाय, बीड जिल्ह्याला मागास म्हणून माझ्या जिल्ह्याची बदनामी करू नका. अशी परखड टीका मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मतदार ‘बिघाडी’च्या उमेदवाराला घरी बसविल्याशिवाय राहणार नाहीत | पंकजा मुंडे

News Desk

अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ, ईडीच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे!

News Desk

नवाब मलिकांच्या अटकेनंतर नितेश राणेंचे ‘हे’ ट्वीट चर्चेत

Aprna