HW Marathi
कोरोना देश / विदेश महाराष्ट्र

मोदींच्या आवाहनाला बळी पडून लाईट बंद करू नका ,उर्जामंत्र्यांचं आवाहन !

मुंबई| कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात संचारबंदी, लॉकडाऊन आहे.पंतप्रधान मोदींना एप्रिलला आवाहन केलं आहे की सगळ्यांनीलाईट्स बंद करून मेणबत्या आणि दिले लावावे. त्यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी टीका केली आहेजनतेने मोदींच्या या आवाहनाला बळी पडू नये असं आवाहन नितीन राऊत यांनी केलं आहे.

मोदींच आवाहन म्हणजे शुद्ध पोरकटपणा आहे. साठी बुद्धी नाटी असं म्हटलं जातं. नरेंद्र मोदी कोणत्याही गोष्टीचा इव्हेंट करतात. हीबाब देशाच्या पंतप्रधानाला शोभत  नाही. देशाच्या १३० करोड जनेतेने एकाच वेळी दिवे बंद केल्याने ग्रीड  फेल झाले तर तांत्रिक बिघाडनिर्माण होऊ शकतो. देशातील विजपुरवठ्यात अडथळा येऊ शकतो. पंतप्रधान म्हणून अपल्याला हे शोभत नाही.

महाराष्ट्राची सद्यस्थिती ही वेगळी आहे. विजेची मागणी ही २३,००० मेगावॅट वरून १३,००० मेगावॅटवर आली आहे. लॉकडाऊनमुळेइंडस्ट्रीयल लोड हा झिरो आहे. १३,००० मेगावॅट ही फक्त अत्यावश्यक सेवा आणि घरगुती वापरासाठी वापरली जात आहे. जर सर्वांनीअचानक दिवे बंद केले तर ग्रिड फेल होईल. सर्व पॉवर स्टेशन हाय फ्रिक्वेन्सीवर ट्रिप होतील. संपूर्ण राज्य अंधारात जाईल. महाराष्ट्रासारखे मोठे पॉवर डिमांड असलेल्या राज्यात जर ग्रीड फेल्युअरमुळे सर्व पॉवर स्टेशन बंद पडले तर मल्टीस्टेट ग्रीड फेल्युअर होऊन संपूर्णदेश अंधारात जाईल. अत्यावश्यक सेवा हॉस्पिटल सेवा विस्कळीत होईल. सर्व परिस्थिती नॉर्मल व्हायला एक आठवडा तरी जाईल

मी महाराष्ट्राचा  ऊर्जा मंत्री म्हणून मी जनतेला आवाहन करतो कोणीही आपल्या घरचे दिवे एप्रिलला बंद करू नका. . मोदींनीसांगितल्याप्रमाणे दिवे लावायचे असेल तर लावा मात्र इलेक्ट्रिक बल्ब  बंद करू नका. मोदी देशाच्या जनतेला पागल बनवत असेल तरतुम्ही खुशाल पागल बना. मात्र ऊर्जा मंत्री म्हणून तुम्हाला धोक्यापासून सावध  करत आहे. उद्या काही समस्या आली तर पंतप्रधानजबाबदार राहतील.

Related posts

#Vidhansabha2019 : कणकवलीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना संघर्ष

News Desk

फडणवीस, चंद्रकांत पाटील, राज ठाकरेंसह ‘या’ नेत्यांच्या सुरक्षेत कपात; ठाकरे सरकारचा निर्णय

News Desk

राज ठाकरे यांच्या भाषणात शरद पवारांचा प्रभाव | आशिष शेलार

News Desk