HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका – चित्रा वाघ

मुंबई। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत्या आणि अखेर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांचे नाव निश्चित झाल आहे. आणि यावरूनच आता, अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका, अशा बोचरा वार भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांचं नाव न घेता केलाय. आज त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वीच आज सकाळीच चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन चाकणकरांवर घणाघाती वार केला आहे.

तरी त्यांचा रोख चाकणकरांकडे आहे, हे स्पष्टच

महिला आयोगाचा अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका, असा हल्ला चढवत जर चाकणकरांची निवड झाली तर प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल, असा सल्ला त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये चाकणकरांचं नाव घेतलेलं नाही. पण रात्रीपासून महिला आयोगाच्या अध्यक्षपदी चाकणकरांची निवड निश्चित झाल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे जरी चित्रा वाघ यांनी नाव घेतलेलं नसलं तरी त्यांचा रोख चाकणकरांकडे आहे, हे स्पष्ट आहे.

अनेकवेळा चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये खडाजंगी

धनंजय मुंडे आणि मेहबूब शेख प्रकरणात भाजपने केलेल्या आरोपांना रुपाली चाकणकर यांनी सडेतोड उत्तर देत पक्षातील नेत्यांसाठी बॅटिंग केली होती. आरोप होत असतात, चौकशी होते आणि दोषी असेल तर न्यायालय शिक्षा देतं, तुम्ही त्यांना अगोदरच दोषी का ठरवताय? असे सवाल चाकणकर सातत्याने भाजप नेत्यांना विचारत राहिल्या. अनेकवेळा चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये याच प्रकरणांवरुन खडाजंगीही झाली. आता महिला आयोगाच्या अध्यक्षपदी चाकणकर यांचं नाव चर्चेत येताच किंबहुना अधिकृत घोषणेच्या शक्यतेअगोदरच चित्रा वाघ यांनी चाकणकरांवर घणाघाती हल्ला चढवून दोघींमधल्या वादाच्या पुढच्या अंकाची कशी सुरुवात होणार आहे, याची झलक दाखवून दिलीय.

 

 

Related posts

लोकांनी रस्त्यावर येऊन ढोल वाजवले होते, आता आग नाही लावली म्हणजे झाले !

News Desk

‘मोदी है तो मुमकीन है’ हा भाजपचा विश्वास लोकशाहीसाठी चिंता वाढवणारा! सचिन सावंत

News Desk

ऑनलाईन शिक्षण असूनही पालकांवर फीसाठी दबाव आणणाऱ्या संस्थांवर कारवाई होणार – वर्षा गायकवाड

News Desk