HW News Marathi
Covid-19

चंद्रपूर जिल्ह्यात एक लाख नागरिकांकडून ‘आरोग्यसेतू’ॲप डाऊनलोड

चंद्रपूर | कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी केंद्र व राज्य शासन विविध उपाययोजना राबवित आहे. सर्वात महत्त्वाची उपायोजना म्हणजे देशभरात सर्वच ठिकाणी लॉकडाऊन केले आहे. कोरोनाशी संबंधित माहिती, आजूबाजूला असलेल्या संक्रमित व्यक्तींची माहिती म्हणजेच कोरोना विषाणूची जोखीम कितपत आहे. यासाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतू ॲप लॉन्च केले आहे. जिल्ह्यात १ लाख २ हजार ८४५ नागरिकांनी ॲप डाऊनलोड करून त्याचा वापर करीत आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे. हे अ‍ॅप मराठी आणि हिंदी या भाषांसोबत ११ भाषांमध्ये उपलब्ध आहे.

कोरोना विषाणूबाबतची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी आणि सर्वांनी याबाबत सजग राहून त्याविरोधात लढा उभारावा, यासाठी हे अ‍ॅप मार्गदर्शन करेल. सर्व भारतीय भाषांमध्ये सदर अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले असून सर्वांना समजेल अशी माहिती त्यावर आहे. आरोग्य सेतू अ‍ॅप ब्लूटूथ आणि जीपीएसचा वापर करते. जीपीआरद्वारे व्यक्तीचं रिअल टाईम लोकेशन ट्रॅक करण्यात येते. तसेच कोणताही कोरोनाग्रस्त व्यक्ती जवळ आल्यास हे अ‍ॅप ट्रॅक करणार आहे. ६ फूट अंतरापर्यंत हे अ‍ॅप व्यक्तीला ट्रॅक करू शकते.

कोरोनाविरोधातील लढाईत लोकांना आरोग्य सेवांशी जोडणं हा अ‍ॅपचा प्रमुख उद्देश आहे. अंगणवाडी, आशा कार्यकर्त्यांसह शालेय शिक्षक आणि आरोग्य खात्यांच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या अ‍ॅपबाबत जनजागृती निर्माण केली जात आहे. आयओएस आणि अ‍ॅन्ड्रॉईड फोनवर हे अ‍ॅप डाऊनलोड केले जाऊ शकते.

कोरोनाला घाबरू नका, आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करा आणि कोरोनाशी संबंधित माहिती जाणून घ्या. आपल्या आजूबाजूला असलेल्या संक्रमित व्यक्तींची माहिती तसेच प्रत्येक राज्याचे हेल्प डेस्क नंबर आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या फोनमध्ये ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

आरोग्य सेतू अ‍ॅप असे करा डाऊनलोड

गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आरोग्य सेतू सर्च करून हे ॲप डाऊनलोड करता येणार आहे. हे ॲप नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने (एनआयसी) बनवलेले आहे त्यामुळे एनआयसीने जारी केलेले ॲपच डाऊनलोड करावे.

आरोग्य सेतू अ‍ॅप कसे वापरावे?

आयओएस आणि अ‍ॅन्ड्रॉईड फोनवर हा अॅप डाऊनलोड करावा. त्यानंतर ब्लुटूथ आणि लोकेशन ऑन करावे. त्यात सेट लोकेशन “ऑलवेज” असे ठेवावे. आपल्याला आवश्‍यक असलेली भाषा त्यावर नमूद केल्यास त्या भाषेमध्ये सर्व माहिती आरोग्यसेतूद्वारे उपलब्ध होते. अ‍ॅपमध्ये असलेल्या प्रश्‍नांची उत्तरे स्पष्टपणे दिल्यास आपल्यामध्ये कोविडच्या आजाराची लक्षणे आहे का? याची माहिती देखील लगेच मिळते. यासह इतर आजारांविषयीची माहितीदेखील त्यावर मिळत असल्याने हा अ‍ॅप लोकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लहान मुलांसाठी मॉडर्ना कंपनी लवकरच 50 मायक्रोग्राम मात्रेच्या लसींची करणार निर्मिती

News Desk

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचं पालकत्व राज्य सरकार स्विकारणार – मुख्यमंत्री

News Desk

दिलासादायक ! परळी तालुका कोरोनामुक्त

News Desk