Site icon HW News Marathi

पाझर तलाव फुटल्याने 30 हेक्टरवरील पिकासह जमिनीही गेल्या खरडून

शिवशंकर निरगुडे | हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथील धामणदरा भागातील मुसळधार पावसामुळे कृषी विभागाचे बांधलेला पाझर तलाव शुक्रवारी (29 जुलै ) हा तलाव फुटला या तलावाच्या पाण्यामुळे सुमारे 30 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. जमिनीही पूर्णपणे खरडून गेल्या आहेत. औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव परिसरात पंधरा वर्षापुर्वी कृषी विभागाच्या मार्फत पाझर तलाव निर्माण केला होता. हा तलाव मागील दोन वर्षापुर्वी देखील फुटला होता. मात्र, आजूबाच्या शेतकऱ्यांनी हा तलाव दुरुस्त करून घेतला होता. मात्र, जिल्ह्यात मागील 25 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. अतिवृष्टीमुळे हा तलाव फुटला तलावाचे पाणी शेतात शिरल्याने सोयाबीन, तूर .कापूस .उडीद .हळद यासह आदी पिके वाहून गेली आहेत त्याच बरोबर जमिनीही खरडूण गेल्या आहेत.

शेतकऱ्यांकडून तात्काळ पंचनामे करून मदतीची मागणी

ओढा हा सरळ शेतातून गेल्यामुळे शेत खरडले तसेच शेतकरी दत्तराव रवंदळे यांच्या शेतातील स्पींक्लरच्या 30 पाईप वाहून गेली असून यातील 13 सापडल्या असुन बाकी 17 पाईप चा शोध सुरू होता. 17000 रु नुकसान झाले आहे तसेच या शेत
शिवारातील ओढ्याचे पाणी शेतात जाऊन किसन सांगळे बबनराव सांगळे. पद्माबाई भिमराव खिलारे.बंडू भिकाजी सांगळे.नथू सांगळे. निळकंठ सांगळे. पार्वती बाबाराव सांगळे.. गोविंदराव खिलारे. विनायक सांगळे. सदाशिव सांगळे. दारकाबाई उत्तम सांगळे. बालाजी खिलारे. गणपत साहेबराव सांगळे. अनंता साहेबराव सांगळे. दादाराव रुस्तुम सांगळे दत्तराव रवंदळे. गंगाराम नागरे. घनश्यामपुरी.परागबाई रुस्तुम यादव बाबाराव सांगळे. दादाराव रुस्तुम सांगळे. सखुबाई साहेबराव सांगळे. ई शेतकर्यांचे शेतीचे नुकसान झाले तरी पंचनामे करुन योग्य ती मदत द्यावे अशी मागणी शेतकरी यांनी केली

Exit mobile version