HW News Marathi
क्राइम

Pune Wall Collapse : १४ जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

पुणे | कोंढवा परिसरातील बडा तालाब मस्जिद परिसरात आल्कार स्टायलस या इमारतीची संरक्षण भिंत कोसळून १५ मजुरांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूच्या बिल्डरांसह एकूण १४ जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी कांचन डेव्हलपर्सचे पंकज व्होरा, सुरेश शहा, रश्मीकांत गांधी या बिल्डरांसह साईट इंजिनीअर, साईट सुपरवायझर आणि मजूर पुरवणारा कंत्राटदार अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. तर भिंत कोसळलेल्या आल्कन स्टायलस लॅंडमार्कस् या बांधकाम संस्थेच्या पाच भागीदार बिल्डरांसह एकूण आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये जगदीशप्रसाद अग्रवाल, सचिन जगदीशप्रसाद अग्रवाल, राजेश जगदीशप्रसाद अग्रवाल, विवेक सुनिल अग्रवाल, विपूल सुनील अग्रवाल यांच्यासह साईट इंजिनिअर, साईट सुपरवायझर, कंत्राटदार यांचा समावेश आहे.

राज्य सरकारकडून मदत

आल्कार स्टायलस या इमारतीची संरक्षण भिंत कोसळून १५ मंजुराचा मृत्यू झाला आहे. मृत पावलेच्या नातेवाईकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखा तर जखमींना २५ हजार रुपयाची मदतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गणपती विसर्जन मिरवणुकीत तरूणावर चाकू हल्ला, तरूणाचा मृत्यू

News Desk

पोलीस भरतीसाठी उमेदवाराची ‘डोकॅलिटी

News Desk

भावजयीच्या प्रेमात दीर झाला बेभान, पत्नी आणि मुलांचा गळा चिरला

News Desk