HW News Marathi
महाराष्ट्र

दहावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींची बाजी

मुंबई | महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाकडून दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्याचा ८९.४१ टक्के निकाल लागला आहे. सालाबाद प्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलीचा निकाल ९१.९७ टक्के इतका लागला आहे. तर ८७.२७ टक्के मुले पास झाली आहेत. बोर्डाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदत घेऊन निकालासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यात कोकण विभागाचा ९६ टक्के निकाल लागला आहे. यंदा राज्यातून १६ लाख २८ हजार ६१३ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती.

  • राज्यातील विभागाचे निकाल खालीलप्रमाणे
  1. कोकण- 96
  2. पुणे- 92.08
  3. कोल्हापूर- 93.88
  4. मुंबई- 90.41
  5. औरंगाबाद- 88.81
  6. नाशिक- 87.42
  7. अमरावती- 86.49
  8. लातूर- 86.30
  9. नागपूर- 85.97

दहावीचा निकाल या वेबसाईटवर पाहू शकता

  1. www.mahresult.nic.in
  2. www.sscresult.mkcl.org
  3. www.maharashtraeducation.com
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

SushantSinghCase : ज्यांनी महाराष्ट्राची आणि पोलिस दलाची बदनामी केली त्यांनी जाहीर माफी मागावी – रोहित पवार

News Desk

मराठा आरक्षणासाठी नारायण राणेंची समिती नेमून चूक केली, हसन मुश्रीफांचे मोठे वक्तव्य

News Desk

विकासकामे करून दाखवणारे सरकार! – उद्धव ठाकरे

Aprna