Site icon HW News Marathi

अधिवेशनादरम्यान मंत्रालयात दोन जणांनी केला आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई | राज्यात पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सुरू आहे. अधिवेशनाचा आज (23 ऑगस्ट) तिसरा दिवस असून विधानभवन परिसरता दोन जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. उस्मानाबाद येथील सुभाष उंदरे यांनी विधानभवनात आज दुपारीच्या सुमारास आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. उंदरेंनी अंगावर रॅकेल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला वाचवण्यात यश आले आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, विधानभवनात सायंकाळच्या सुमारास मंत्रालयाच्या टेरेसवर एका व्यक्तीने चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेवेळी तात्काळ अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि आत्महत्या करणाऱ्या व्यक्ती वाचवण्यात यश आले. मंत्रालयाच्या टेरेसवर चढल्या व्यक्तीची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. यापूर्वी विधानभवनात अनेक जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

या प्रकरणाचे पडसाद सभागृहात देखील पडलेले पाहायला मिळाले. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. यानंतर सभागृहात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या प्रकरणाची आम्ही माहिती घेतली असून शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल करण्याचे त्यांचे सांगितले,” असे त्यांनी आश्वासन दिले आहे.

 

 

Exit mobile version