HW News Marathi
महाराष्ट्र

अनिल देशमुखांना आणखी एक धक्का, ED ने टाकली निकटवर्तीयाच्या घरावर धाड

नागपूर | 100 कोटी वसुली प्रकरणी अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. देशमुख यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा अजूनही कायम आहे. ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर आज नागपूरमधीलत्यांच्या निकटवर्तीय असलेल्या व्यक्तीच्या घरावर छापा टाकला आहे. ईडीने अनिल देशमुख यांच्याविरोधात ECIR म्हणजेच एफआयआर दाखल केला. त्यानंतर आज सकाळी नागपूर मध्ये ईडीने धाड टाकली आहे.

अनिल देशमुख यांच्या जवळच्या 3 मित्रांच्या घरी ईडीने धाड टाकली. आज सकाळी 7 वाजता ईडीने ही कारवाई केली होती. नागपूरच्या शिवाजी नगरमधील व्यावसायिक सागर भटेवार, समित आयझॅक आणि जाफरनगरमध्ये राहणारे जोहर कादरी या तिघांच्या घरी ईडी ने धाड टाकली. सकाळी 8 वाजेच्या सुमारास तीन सदस्यांचे ईडीचे पथक शिवाजी नगर भागात राहणाऱ्या सागर भटेवार यांच्या घरी पोहोचले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महत्वाची कागतपत्रे ईडीच्या पथकाने जप्त केली. जोहर व समित यांच्या घरून देखील महत्वाची कागदपत्र जप्त करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. सागर भटेवार हे अनिल देशमुख यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.

सागर भटेवार हे अनिल देशमुख यांचे निकटवर्तीय आणि व्यावसायिक भागीदार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून भटेवार हे अनिल देशमुख यांच्या संपर्कात होते, त्यामुळेच ईडीने भटेवार यांच्यावर घरावर छापा टाकला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीची टीम भटेवार यांची चौकशी करत आहे.

याआधी अनिल देशमुख यांची प्राथमिक चौकशी केल्यानंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दिल्लीत दाखल करण्यात आला असून देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहे. आता या प्रकरणात ईडीने अनिल देशमुख यांच्यावर ECIR म्हणजेच एफआयआर दाखल केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेश दिला होता.

यानंतर सीबीआयने अनिल देशमुख यांच्या विरोधात प्राथमिक तपास करून त्या तपासाच्या आधारावर ती अनिल देशमुख यांच्यावर 21 एप्रिल या दिवशी दुपारी 4 वाजता सीबीआयच्या दिल्ली येथील पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला. या एफआयआरच्या अनुषंगाने सीबीआयने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुम्ही मोरासोबत फोटो काढा किंवा घोड्यावर बसा… पृथ्वीराज चव्हाणांचा मोदींवर निशाणा

News Desk

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची प्रकरणावर 21 मार्चला होणार सुनावणी

Aprna

सत्ता गेल्यानंतर तुमच्या वृत्तीमधला हा बदल आम्ही ‘ बंगला सोडतानाही पाहिला – रुपाली चाकणकर

News Desk