HW News Marathi
महाराष्ट्र

औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग नागेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी

शिवशंकर निरगुडे | हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ (Aundha Nagnath) येथील आठवे ज्योतिर्लिंग हे मंदिर जग प्रसिद्ध आहे. दोन वर्ष हे मंदिर कोरोनामुळे हे मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र या वर्षी सर्व नियम शिथिल झाल्यामुळे या वर्षी हे मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी खुल्ले करण्यात आले आहे. या मंदिराची कला कौशल्य, प्राचीन असून पुरातत्त्व हेमाडपंथी मंदिर हे मराठवाड्यातील तीन ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणून जगप्रसिद्ध आहे. मंदिरावर नक्षीदार कोरीव काम आणि छटा जगभरातील भाविकांना आकर्षित करतात. आज जगभरातून महाशिवरात्रीनिमित्त भाविक लाखोच्या संख्येने श्री नागनाथ प्रभूच्या दर्शनासाठी येतात. शासकीय पूजेनंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुल्ले करण्यात आले आहे.

देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले औंढा नागनाथ येथील आठवी ज्योतिर्लिंग नागेश दारू कावणे येथे आज पहिल्या श्रावण सोमवारी रात्री दोन वाजता शासकीय पूजा संपन्न झाल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. नागनाथ देवस्थानचे एक्स तथा तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले यांनी सपत्नीक दुर्गाभिषेक करून नागनाथ प्रभूची महापूजा केली.यानंतर मंदिर भाविकांना खुले करण्यात आले.पहिल्या श्रावण सोमवार असल्यामुळे भाविकांनी देशभरातून गर्दी केली आहे. नागनाथ प्रभूच्या दर्शनासाठी लांबच लांब रंगा लागल्या होत्या देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात. हर हर महादेव, बम बम बोलेच्या गजरात मंदिर परिसर दुमदुमून गेला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.बारीमध्ये दर्शनासाठी उभे ठाकलेल्या भाविकांना देवस्थानच्या वतीने फराळ पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.श्रावण मासात औंढा नगरीत भव्य यात्रा सुद्धा भरते. मंदिराच्या सभोवताल पर्यटन स्थळ असल्यामुळे भाविक दर्शनासोबतच पर्यटनाचा सुद्धा आनंद घेतात.

औंढा नागनाथ येथील ज्यातिलिंग शंकराचे पाच हजार वर्षा पूर्वी

औंढा नागनाथ येथील जोतिर्लिंग शंकराचे येथील मंदिर हे पाच हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जातंय. संपूर्ण मंदिर एकाच पाषाणाच्या अखंड काळ्या दगडात कोरले असून यावर, हत्ती, घोडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे कोरीव काम केल्याच दिसून येते. मंदिरात प्रवेश करण्यासाठी, मुख्य तीन दरवाजे असून मंदिराचा मुख्य भाग भूगर्भात आहे. भूगर्भात प्रवेश केल्यानंतर आपल्याला महादेवाची पिंड दिसते. ही पिंड महादेव आणि श्री विष्णू देवाची असल्याचे मानल्या जाते. त्यामुळे नागनाथला हरिहर या नावानेही ओळखलं जाते. त्यामुळे येथे पिंडीला दुर्वा, बेल, फुले, नारळाची आरास वाहिली जाते. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात प्रभू शंकराचं दर्शन घेतल्याने भविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात, अशी मान्यता आहे.

 

मंदिराची उंची 96 फूट एवढी उंची

प्राचीन काळात पाषाणात बांधलेल्या बारा ज्योतिर्लिंगांमधील आठव्या स्थानावर औंढा नागनाथ (नागेश्वर) ज्योतिर्लिंग आहे. या गावात एकेकाळी आमदरक सरोवर होते. हे मंदिर एका विस्तीर्ण 290 बाय 190 फूटाच्या आवरात आहे. त्या भोवती एक मोठा परकोट आहे. परकोटाला चार मुख्य प्रवेशद्वार आहेत. त्यातील उत्तरेकडील प्रवेशद्वारवर नगारखाना आहे. तेच मुख्य प्रवेशद्वार आहे. आवारातच एक पायविहीर आहे. तिचा नागतीर्थ असा उल्लेख केला आहे. ‘सासू सुणेची बारव’ असेही तील म्हणतात. मुख्य मंदिराची लांबी 126फूट रुंदी 118 फूट आणि मंदिराची उंची 96 फूट एवढी असून मंदिराला कुठलाही पाया नसून जमीनीच्या पृष्ठ भागावर या मंदिराची रचना केली आहे. तर, संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या काळात संत नामदेव महाराज कीर्तन करत असताना मंदिराने आपली जागा बदलली असल्याचा येथील भाविकांचा समज आहे. बाहेरुन मंदिराचे दोन भाग पाहायला मिळतात. पूर्वी मोगल साम्राज्यात येथील मंदिराचा काही भाग मोघलांनी पाडला असल्याचं सांगितलं जाते. यानंतरच्या काळात आहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करुन मंदिराच्या कळसाची स्थापना केली असल्याचं इतिहासात नोंद आहे. म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरातून भाविक येथे येतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कंगनाच्या ऑफिसवर पालिकेचा हातोडा, तर कंगनाने बीएमसीची तुलना केली बाबराशी 

News Desk

आता ‘मराठा क्रांती ठोक मोर्चा’ विधानसभा लढविणार

News Desk

गुणरत्न सदावर्तेंनी ST कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याचे न्यायालयात केले मान्य, कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात

Aprna