HW News Marathi
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस अजित पवारांवर टीका करूच शकत नाही, मुहूर्त साधत लग्न केलं होतं!

मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकनाथ खडसे यांनी तोफ देखील डागली आहे.देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करू शकत नाही. कारण मुहुर्त साधत लग्न करून शपथ घेत तीन चार दिवस संसार करत ते मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री झाले होते. तीन-चार दिवस दुसऱ्याच्या घरात राहिल्यावर पतिव्रता आहोत, असं आम्ही म्हणू शकत नाही. कारण आता नैतिकता घालवल्या गेली आहे, अशा परखड शब्दांत एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

एकनाथ खडसे यांनी सांगितलं की, देवेंद्र फडणवीस एकटेच लढत असून महाराष्ट्रभर फिरत आहे. पूर्वी आमचं टीम वर्क होतं. त्यात दिवंगत गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर नितीन गडकरी यांच्या तोफ चालयचा तर अलीकडे माझासह पंकजा मुंडे, गिरीश बापट, विनोद तावडे, हरिभाऊ बागडे असा आमचा एकत्र ताफा होता. त्यामुळे सरकार घाबरून गांगारून जायचं. मात्र, आता महाराष्ट्रातली सर्व नेते मंडळी शांत बसलेली आहेत. जनतेनं निवडून दिलेल्या चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर नेते अधून मधून बोलतात. मात्र जी आक्रमक भाषा पाहिजे, ती त्यांच्या कुठेच दिसत नाही. आम्ही कमी पडत आहोत, असं मतही एकनाथ खडसे यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला होता. महाआघाडी सरकार पडेल, ही भाबडी आशा सोडून द्या, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या संध्येला स्वपक्षीय नेत्यांचे कान टोचले होते. महाआघाडी सरकारमध्ये एक-दीड वर्षात उलथापालथ होईल, असं वाटतं नसल्याचंही खडसे यांनी सांगितलं होतं. महाविकास आघाडी सरकारकडे आवश्यक संख्याबळ आहे, त्यामुळे राज्यातील सरकार पडेल, ही आशा करणं सोडावी, असा सल्ला खडसेंनी स्वपक्षीय नेत्यांना दिला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी मिळणार

News Desk

२०२४ मध्ये नाना पटोले मुख्यमंत्री काँग्रेसचा करणार! सेनेनं दिला सूचक इशारा

News Desk

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी या सरकारकडे एक रुपया नाही | सुनिल तटकरे

News Desk