HW News Marathi
महाराष्ट्र

सगळे मुहूर्त तुमचेच आहेत, नो कमेंट्स, राष्ट्रवादी प्रवेशावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया

जळगाव | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पक्षावर कमालीचे नाराज असून लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या समर्थकांनी खडसेंचा याचा प्रवेश निश्चित असल्याचे सांगितले आहे. पण, आता एकनाथ खडसे यांनीच राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या चर्चेवर ‘नो कमेंट’ अशी प्रतिक्रिया देऊन गुगली टाकली आहे.

एकनाथ खडसे आज (१७ ऑक्टोबर) नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता स्वतः एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीतील त्यांच्या प्रवेशावर नो कमेंट्स असे म्हटले आहे. काल दुपारी जळगावात खडसेंनी राष्ट्रवादीतील प्रवेशावर मला काहीही बोलायचे नाही. मुहूर्त तुमचेच आहेत असं म्हणत विषय टाळला होता. दरम्यान, ते भाजप सोडणार आणि राष्ट्रवादीत जाणार याला त्यांच्या अनेक समर्थकांनी दुजोरा दिला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

असाल तेथेच थांबून राहा, आपल्या निवास व भोजनाची हमी आमची !

News Desk

भोंदू बाबांच्या नादी न लागता डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर श्रद्धा ठेवा –  रामदास आठवले

News Desk

सत्तेसाठी शिवसेनेने सगळी तत्वे गुंडाळून मातोश्रीच्या एका कोपऱ्यात ठेवली !

News Desk