Site icon HW News Marathi

अनिल देशमुखांची ४ कोटी २० लाखांची संपत्ती ईडीकडून जप्त

मुंबई | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. याचं कारण असं की, आज (१६ जुलै) ई़डीने अनिल देशमुखांची ४ कोटी २० लाखांची संपत्ती जप्त केली आहे. यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता दिसत आहे. इतकंच नाही तर, काही दिवसांपूर्वी समन्स पाठवून ईडीने अनिल देशमुखांचा चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, ते चौकशीसाठी गैरहजर होते. काल (१५ जुलै) अनिल देशमुखांची पत्नी आरती देशमुख यांनाही ईडी कायर्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, कोरोनाचा कारण देत त्याही चौकशीला गैरहजर होत्या. यामुळे देशमुखांच्या अडचणीत एकूणच वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

सचिन वाझे अनिल देशमुखांना एकदाच भेटले, देशमुखांच्या वकिलांचा दावा

सचिन वाझेंच्या प्रकरणामुळे सध्या राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अशात अनिल देशमुखांचे वकील अॅड. कमलेश घुमरे यांनी आज (14 जुलै) पत्रकार परिषद घेत धक्कादायक खुलासा केला आहे. आम्ही गुन्हा रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. ईडीकडून अनेक बातम्या येत होत्या. त्यात अनेक विसंगतीही होत्या. नक्की सत्यता काय आहे? हे सांगण्यासाठीच आपण आज आल्याचं घुमरे म्हणाले. या प्रकरणाची सुनावणी संपली आहे. अनिल देशमुख हे सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. याबाबत येणाऱ्या बातम्या केवळ ऐकिव आहेत. हायकोर्टातील प्रकरणावर आपण भाष्य करणार नाही, असंही घुमरे म्हणाले आहेत.

सचिन वाझे आणि अनिल देशमुख प्रकरणात न्यायमूर्ती चांदिवाल यांच्या कमिशनसमोर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्या ठिकाणी सचिन वाझे याने प्रतिज्ञापत्र साद केलंय. त्यात तो काही बोलत नाही. त्यात तो ४ कोटी ७० लाख रुपयांबाबत काही बोलत नाही. अनिल देशमुख यांना भेटल्याचंही वाझे सांगत नाही. आपण फक्त जानेवारीमध्ये एकदाच भेटल्याचं सांगत वाझे सांगत असल्याचंही घुमरे म्हणाले आहेत. ईडी आणि सीबीआय जेव्हा जबाब घेतात तेव्हा त्यांचा माणूस तिथे असते. मात्र, आयोगासमोर मोकळ्या वातावरणात प्रतिज्ञापत्र दिलं आहे, असंही घुमरे यांनी म्हटलं आहे.

‘100 कोटी रुपयांचा आरोप खोटा, बारची संख्याही विसंगत’

आयोगासमोर आलेल्या प्रतिज्ञापत्रात सचिन वाझे याने पैसे दिले असं सांगत नाही. सचिन वाझे यांनी दिलेला जबाब हा दबावाखालीच असावा. अधिकाऱ्यांसमोर दिलेला जबाब दबावाखालीच असतो. CRPC मध्ये पोलिसांसमोर दिलेल्या जबाब स्वीकारला जात नाही. 100 कोटी रुपयांचा आरोप खोटा आहे. बारची संख्याही विसंगत आहे, असा दावाही घुमरे यांनी केला आहे.आतापर्यंत अनिल देशमुख, आरती देशमुख, ऋषिकेश देशमुख या तीन जणांना ईडीने समन्स दिलं आहे. आरदी देशमुख यांना आजचं समन्स दिलं होतं. त्या 66 वर्षांच्या आहेत. त्यांना कोरोना झाला आहे. त्यांना अनेक आजार आहेत. त्या गृहिणी आहे. त्यांचा व्यवहाराशी काही संबंध नाही, असंही घुमरे यांनी म्हटलंय. तसंच ईडीने पेपर हे पब्लिक डॉक्युमेंट व्हायला हवे, अशी मागणीही देशमुखांच्या वकिलांनी पत्रकार परिषदेत यावेळी केली आहे.

Exit mobile version