HW News Marathi
महाराष्ट्र

आधी बैलगाडीभर पुरावे आता ६.३ जीबी डेटा ! फडणवीसांवर का टिका होतेय ?

मुंबई | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील पोलिस दलातील बदलीचे रॅकेट आणि फोन टॅपिंगचे आपल्याकडे पुरावा असल्याचा दावा केला आहे.ते पुरावे ६.३ जीबी इतके आहेत आणि ते घेऊन आपण आजचं दिल्लीला जाणार आहोत,केंद्रीय गृहसचिवांकडे CBI चौकशीची मागणी करणार आहोत असे फडणवीसांनी आज जाहीर केले आहे.

या सगळ्या दरम्यान पुरावे सादर करण्याच्या फडणवीसांच्या बदललेल्या पद्धतीवर नेटकऱ्यांनी चर्चा करायला सुरूवात केली आहे.राज्यात युतीचे सरकार येण्याआधी म्हणजे २००९-२०१४ मध्ये फडणवीसांनी आघाडी सरकराच्या विरोधात आंदोलनांचा सपाटा लावला होता.सिंचन घोटाळ्यात तर अजित पवार यांच्याविरोधात बैलगाडीभर पुरावे आणुन फडणवीसांनी लक्ष वेधले होते.मात्र त्यानतंर या प्रकरणात अजित पवारांना क्लीन चीट मिळाली इतकचं काय तर फडणवीस -अजित पवार यांचं अल्पजीवी सरकराही स्थापन झाले होते.

त्यामुळे आधी बैलगाडीभर पुरावे ज्यांच्या विरोधात दिले,नंतर त्यांच्यासह मांडीला मांडी लावून सरकरामध्ये आले.आता पुन्हा राष्ट्रवादीच्या विरोधात,सरकारच्या विरोधात ६.३ जीबी पुरावे घेऊन फडणवीस दिल्लीला गेलेत.फडणवीसांचा पुढचा प्लॅन काय ? अशाी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धर्माबादच्या प्रवाशांनी मांडल्या डीआरएम जैन यांच्याकडे रेल्वेच्या समस्या

News Desk

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावास लवकर मंजुरी द्यावी; मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती

Aprna

साहेब… राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या स्वप्नांचा विचार करा; चित्रा वाघ यांचा खोचक टोला

News Desk