HW News Marathi
देश / विदेश

फडणवीसांकडून शाहू महाराजांचा ‘सामाजिक कार्यकर्ते’ असा उल्लेख, नेटिझन्स संतापले

मुंबई | लोककल्याणकारी राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची आज (६ मे) पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने सर्व राजकीय पक्ष आणि नेतेमंडळींकडून छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले. मात्र, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी यानिमित्ताने जी पोस्ट केली त्यामुळे त्यांच्यावर नेटिझन्सकडून प्रचंड टीका झाली. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा उल्लेख चक्क ‘सामाजिक कार्यकर्ते’ असा केला. त्यानंतर फडणवीसांच्या या पोस्टवर सोशल मीडियातून प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका झाली. “शाहू महाराज हे राजे होते, ते छत्रपती होते, त्यांनी समाजसुधारणेचा आणि समाज प्रबोधनाचा पाया रचला मात्र म्हणून त्यांचा उल्लेख सामाजिक कार्यकर्ते असा करणे हा त्यांचा अपमान आहे. फडणवीसांनी याबाबत माफी मागावी”, अशी टीका फडणवीसांच्या या पोस्टवर नेटिझन्सकडून करण्यात आली. या टीकेनंतर देवेंद्र फडणवीसांनी आपली ही पोस्ट डिलीट केली.

देवेंद्र फडणवीस यांनी ही आपली जुनी आणि वादात सापडलेली पोस्ट डिलीट केल्यानंतर लगेचच एक नवी पोस्ट अपलोड केली. या नव्या पोस्टमध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा उल्लेख “सामाजिक क्रांतीचे जनक वंचितांचे शिक्षण, हक्कांचा पुरस्कार करणारे छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांना स्मृतिदिनी शत शत नमन!” असा करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

झारखंडमध्ये ५ नक्षलवाद्यांचा खात्मा

News Desk

‘भाजप चले जाव म्हणायची वेळ आली’, नाना पटोलेंचा केंद्रावर हल्ला

News Desk

#NirbhayaCase : ४ आरोपींना १ फेब्रुवारीला सकाळी ६ वा, होणार फाशी

swarit