HW News Marathi
महाराष्ट्र

बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट बनवत पैशांची केली मागणी

शिर्डी | महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्येच्या नावाने बनावट फेसबुक खाते उघडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉ. जयश्री थोरात यांच्या नावे फेसबुक युजर्सकडून पैशांची मागणी केली जात आहे. या प्रकरणी अहमदनगरमध्ये पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
काँग्रेसचे दिग्गज नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते उघडण्यात आले आहे. फेसबुक पेजवर बाळासाहेब थोरात आणि डॉ. जयश्री थोरात यांच्या फोटोचा गैरवापर देखील करण्यात आला आहे. या फेसबुक अकाऊण्टच्या माध्यमातून जयश्री थोरात यांच्या नावाखाली अज्ञात व्यक्तीकडून पैशांची मागणी झाल्याचा आरोप आहे.
अहमदनगरमधील संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेब थोरात यांचे सुपुत्र सिद्धार्थ थोरात यांनी पोलिसात तक्रार दिली. गूगल पे आणि फोन पे द्वारे जयश्री थोरात यांच्या मित्र यादीतील व्यक्तींकडून पैशांची मागणी केली जात आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार

News Desk

पळून कोणाबरोबर गेली अन् लग्न कोणा बरोबर केले, राज ठाकरेंची मिश्किल टीका

Aprna

एसटी कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर

News Desk