Site icon HW News Marathi

पाहा व्हिडिओ : पिकांवर ड्रोन द्वारे फवारणी; हायटेक शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

मुंबई | दुष्काळी म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यातला शेतकरी आता हायटेक होऊ लागलाय. केज तालुक्यात पिकांवर ड्रोन द्वारे फवारणी करण्यात आलीय. आणि हा प्रयोग यशस्वी देखील झालाय. केज तालुक्यातील स्थळ येथील शेतकरी हनुमंत काळदाते आणि अशोक शिंदे यांनी हा प्रयोग करत ड्रोनच्या सहाय्याने शेतात कीटकनाशकाची फवारणी केलीय. दिवसेंदिवस शेती कामे आणि अंतर मशागत करण्यासाठी मजूर मिळत नाही. त्यातच मजुरीचे दरही वाढलेत. त्यामुळे शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहे. पहिल्यांदाच हा प्रयोग होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी हे पाहण्यासाठी कुतुगुलाने गर्दी केली होती. दरम्यान कृषी विभागाने देखील यांना मार्गदर्शन केलंय. मनुष्यबळापेक्षा अवघ्या निम्म्या दरात ड्रोनने फवारणी होतेय. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या साहित्याचा वापर शेतकऱ्यांनी करावा अस आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलंय.

Exit mobile version