HW News Marathi
महाराष्ट्र

बांधकाम व्यावसायिक डिएसकें विरोधात ३६,८७५ पानांचे आरोपपत्र दाखल 

पुणे | प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दिपक कुलकर्णी हे ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत आहेत. डी. एस. कुलकर्णीं विरोधात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी आरोपपत्र दाखल केले. पुण्यातल्या शिवाजीनगर सत्र न्यायालयात हे आरोप पत्र दाखल करण्यात आले. डिएसकें विरोधात दाखल करण्यात आलेले हे आरोप पत्र सध्या अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरले आहे. तब्बल ३६,८७५ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी या दोघांविरोधात हे आरोपपत्र असून यामध्ये २ हजार ४३ कोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याचे आरोप यामध्ये नमूद करण्यात आले आहेत. डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांना १७ फेब्रुवारीला पुण्यात अर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली होती. अटकेनंतर तब्बल ९० दिवसांनी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा शिवसेना आणि भाजप युती होऊ शकते, गिरीश बापटांचं वक्तव्य

News Desk

कोरोनाच्या उपाययोजनांना टाटा समूहाचा ५०० कोटींचा निधी जाहीर

swarit

‘बिग बॉस’ फेम अभिजित बिचुकले पुन्हा एकदा निवडणूकीच्या रिंगणात 

News Desk