HW News Marathi
महाराष्ट्र

“ताज महाल आणि ज्ञानवापी मशिदीखाली शिवलिंग शोधून वाद निर्माण करताय,” राऊतांचा केंद्र सरकारवर आरोप

मुंबई | तुम्हीताज महाल आणि ज्ञानवापी मशिदीखाली शिवलिंग शोधतात. तुम्ही हे वाद निर्माण करताय, पण, खरा वाद हा काश्मीरमधल्या पंडितांच्या आक्रोश तुम्ही का ऐकत नाही, असा सवाल उपस्थिती करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. कधी ‘काश्मीर फाईल्स’ तर कधी ‘पृथ्वीराज’ या सिनेमाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत, असा टोलाही राऊतांनी भाजपला लगावला आहे. राऊतांनी आज (५ जून) माध्यमांशी बोलताना ज्ञानवापी मशिद, काश्मीर पंडित, ‘काश्मीर फाईल्स’ तर कधी ‘पृथ्वीराज’ आदी मुद्यांवर भाजपवर टीका केली. तसेच उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा देखील दिल्या.

केंद्र सरकार आठ वर्षे पूर्ण झाल्याने मोदी सरकार उत्सव कसला साजरा करत आहे? असा प्रश्ना पत्रकारांनी राऊत म्हणाले, “काश्मीर हिंदूच्या रक्तांनी रोज भिजून चाले, रोज काश्मीर पंडितांच्या हात्या होत आहेत. हजारो काश्मिरी पंडित आपल्या मुलाबाळा घेऊन पलायन करत आहेत. हिंदू समाजातील इतर लोकांच्या हात्या सुरू आहेत. ऐवढेच नव्हे, सुरक्षा दलात जे मुस्लिम बंधू काम करत आहेत. देशाचे रक्षण करत आहेत. त्यांच्या देखील हत्या सुरू झालेल्या आहेत. श्रीनगरपासून ते पुलवामापर्यंत आतापर्यंत १७ ते २० मुस्लिम अधिकाऱ्यांच्या हत्या झालेल्या आहेत. कारण ते देशाच्या रक्षणासाठी ते उभे आहे काम करत आहेत. आणि सरकार काय करतेय? तर सरकार ‘काश्मीर फाईल्स’ सिनेमाचे प्रमोशन करत आहेत. आता ‘पृथ्वीराज’चे प्रमोशन करत आहेत. हे सरकारचे काम आहे. तिकडे आक्रोश चालेला आहे. काश्मीरमध्ये लोकांचे स्थलांतर, पलायन सुरू आहे. अत्यंत गंभीर परिस्थिती काश्मीरमध्ये सुरू आहे. आणि देशात सरकार भाजपचे आहे. काश्मीर मुद्यावर भाजपचा एकही नेता तोंड उघडायला तयार नाही. तुम्ही ताजमहाल आणि ज्ञानवापी मशिदीखाली शिवलिंग शोधतात. तुम्ही हे वाद निर्माण करताय, पण खरा वाद हा काश्मीरमधल्या पंडितांच्या आक्रोश तुम्ही का ऐकत नाही,  हा आहे. कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काश्मीर पंडितांचे पलायन आणि हत्याबाबात मनापासून संवेदना व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले, महाराष्ट्र सरकार आणि शिवसेना काश्मिरी पंडितांच्या प्रश्नाकडे गंभीरियाने पाहून त्याच्यासाठी जे जे आम्हाला करणे शक्य आहे. ते राज्य सरकार आणि शिवसेना करेल. बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून काश्मीर पंडित आणि शिवसेनेचे नाते कायम राहिले आहे.आणि हेच नाते यावेळी कायम राहिल.” 

 “भाजपला टीका कारायला काय झाले. काश्मीर पंडित मरत आहेत. ते पाहा आणि त्यावर बोलात टीका कसली करताय. १९९० झाली काश्मीर पंडिताचे हत्याकांड झाले. तेव्हा देखील भाजप सत्तेत होता आणि आजही भाजपच सत्तेत आहे, भाजपचे नेते ऐकीकडे टीका करते,” या प्रश्नावर राऊतांनी सडेतोड उत्तर दिले. “पंतप्रधानांनी काल ८ वर्षाचा रिपोर्ट कार्ड दाखविले यावर राऊत म्हणाले, त्या रिपोर्ट कार्डमध्ये काश्मिरी पंडितांना पुन्हा घरी परत आणण्याचे जे वचन दिले होते. ते वचन मोदींच्या ८ वर्षाच्या कार्डमध्ये आहे ते तुम्ही एकदा पाहून घ्या. गेल्या आठ वर्षापासून काश्मीर पंडितांचे पलायन सुरू आहे. सर्जिकल स्टाईक झाल्याने काश्मीर पंडितांची हत्या होणे थांबले का?, वाढली ना. योगी आदित्यानांचा वाढ दिवस आहे, आमच्या त्यांना शुभेच्छा आहे. योगी हे प्रमुख नेते आहेत. हिंदूत्वादी विचारांचे प्रखर असे राष्ट्रीय नेते आहेत. आणि योगींकडून देशाला खूप अपेक्षा आहेत.” 

 

  

काश्मिरची स्थिती नियंत्रणाबाहेर आहे.कधी काश्मिर फाईलचं प्रमोशन होतं, कधी पृथ्वीराजचं प्रमोशन होतं मात्र काश्मिरी पंडीतांच्या दु:खाकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही. 

ताजमहाल आणि ज्ञानवापी मशिदीखाली शिवलिंग शोधत फिरणाऱ्या भाजप नेत्यांना काश्मीरमधील हिंदूंच्या आक्रोशाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. ते ‘काश्मीर फाईल्स’ आणि ‘पृथ्वीराज’ या सिनेमांचे प्रमोशन करण्यात व्यग्र आहेत, अशी टिप्पणी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा रक्तपात सुरु झाला आहे. तेथील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पण केंद्र सरकार चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. त्यांना काश्मिरी पंडितांचा आक्रोश ऐकायला वेळ नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Shivsena leader Sanjay Raut slams BJP over Kashmir issue)

यावेळी संजय राऊत यांनी काश्मीरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारावरुन मोदी सरकारला लक्ष्य केले. काश्मीरमध्ये देशाचे रक्षण करत असलेल्या १७ ते १८ मुस्लीम अधिकाऱ्यांची हत्या झाली आहे. काश्मिरी पंडितांना खोऱ्यातून हुसकावून लावले जात आहे. त्यांचे पलायन आणि स्थलांतर सुरु झाले आहे. मात्र, हे सगळे सुरु असताना केंद्र सरकार काय करत आहे? १९८० साली काश्मीर खोऱ्यातून पंडितांना मोठ्याप्रमाणावर स्थलांतर करावे लागले तेव्हादेखील भाजपचे सरकार होते. आजही भाजपचे सरकार असतानाच त्यांना पलायन करावे लागत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री पिंजऱ्यात बसून आहेत, कामच केलं नाही मग सर्टिफिकेट कसं देणार? नारायण राणेंचा प्रहार

News Desk

ठाकरे घराणं पुन्हा आमने सामने, आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात राज ठाकरेंचे फेरबदल

News Desk

नांदेड जि.परिषदेत फुले-आंबेडकरांवर श्रीपाल सबनिसांचं व्याख्यान

News Desk