HW News Marathi
महाराष्ट्र

आधी मुख्यमंत्री बदलले, आता संपूर्ण मंत्रिमंडळ बदलणार, गुजरातमध्ये भाजपचा प्लॅन!

अहमदाबाद। गुजरातमध्ये नवे मुख्यमंत्री यांनी शपथ घेतल्यानंत लवकरच मंत्रिमंडळाची स्थापना होईल अशी शक्यता होती. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, मंत्रिमंडळातील नव्या चेहऱ्यांवरुन सरकारची गाडी अडली आहे. आणि नाराज आमदार माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींच्या घरी जमा झाले आहेत. मुख्यमंत्र्यांआधी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार होता, मात्र या पेचामुळे हा शपथविधी लांबणीवर टाकण्यात आला. कारण, नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल संपूर्ण मंत्रिमंडळ बदलण्याच्या मूडमध्ये आहेत, ज्यावरुन भाजपमध्ये अंतर्गत कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या मंत्रिमंडळातून 90 टक्के जुन्या चेहऱ्यांना हटवलं जाईल आणि त्याजागी नवे चेहरे आणले जातील.

भाजपच्या जुन्या आणि दिग्गज नेत्यांमध्ये नाराजी पसरली

गुजरात मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता भाजपच्या जुन्या आणि दिग्गज नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींच्या घरी नाराज नेते दाखल होण्यात सुरुवात झाली आहे. या नाराज नेत्यांमध्ये ईश्वर पटेल, ईश्वर परमार, बचु खाबड, वासण आहीर, योगेश पटेल यांचा समावेश आहे. सध्या रुपाणींच्या घरी या नेत्यांची बैठक सुरु असल्याचं कळतं आहे.

समीकरण बसवून स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना संधी देण्याचा विचार

नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे आपल्या मंत्रिमंडळात नवे चेहरे घेण्यास उत्सुक आहेत. तब्बल 20 ते 22 मंत्री आज शपथ घेतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्यामध्ये बहुतांश नवे चेहरे आणि महिलांना स्थान दिलं जाण्याची दाट शक्यता आहे. या सगळ्यामुळे गुजरात भाजपच्या जुन्या नेत्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा मार्ग दाखवला जाऊ शकतो. याशिवाय जातिय समीकरण बसवून स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांना संधी देण्याचा विचार भूपेंद्र पटेल यांनी मांडल्याचं बोललं जात आहे. नितिन पटेल-चुडास्मा को एडजस्ट करना भी चुनौती

जुन्या भाजपच्या मंत्र्याचं काय होणार?

विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक दिग्गज नेत्यांना मंत्रीपद नाकारलं जाऊ शकतं. यामध्ये भाजपचे दिग्गज नेते नितीन पटेल, भूपेंद्र सिंह चुडास्मा, आरसी फाल्दू आणि कौशिक पटेल यांचा समावेश असू शकतो. रुपाणी सरकारमध्ये नितीन पटेल हे उपमुख्यमंत्रीपदासह अर्थमंत्रीपद सांभाळत होते. तर भूपेंद्रसिंह चुडास्मा हे शिक्षण मंत्री होते. आरसी फाल्दूंना कृषीमंत्री करण्यात आलं होतं, तर कौशिक पटेल यांना संसदीय कामकाज हे खातं देण्यात आलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शिवसेनेच्या ओठात काय आणि पोटात काय”, नवनीत राणांची ठाकरे सरकारवर सणसणीत टीका!

News Desk

ग्रामीण मुलींना मिळणार 12 वी पर्यंत एसटीचा मोफत सवलत पास

News Desk

राजकारणातल्या लोकांना अशा पध्दतीने भीती दाखवायला लागले तर देशातील लोकशाहीच संपुष्टात येईल

News Desk