HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून ५जणांचा मृत्यू तर ५ जखमी; पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

पुणे | पुण्यातील येरवडा परिसरात शास्त्रीनगर भागात अंडर-कन्स्ट्रक्शन इमारतीचा स्लॅब कोसळून पाच कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तर या घटनेत पाच जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या दुर्दैवी घटनेत जीव गमावलेल्या कामगारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅणडलवरून ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. 

मोदी ट्वीटमध्ये म्हटले, “पुण्यातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत दुर्घटना झाली असून यात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांचे मी सांत्वन करतो. तसेच मला आशा आहे, की या दुर्घटनेत जखमी झालेले सर्व जण लवकरात लवकर बरे होतील.” तसेच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना देखील या घटनेसंदर्भात ट्वीट केले,  “येरवडा येथील शास्त्रीनगरच्या वाडिया बंगल्याजवळ इमारतीचे बांधकाम सुरू असताना स्लॅबची जाळी कोसळून काही लोक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून आपल्या पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून देवदूत पथकासह युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.”

ही दुर्घटना वाडिया बंगल्याजवळ एका मॉलचे बांधकाम सुरू होते. या ठिकाणी काल (३ फेब्रुवारी) रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास ही घडली आहे. या स्लॅब कोसळला त्यावेळी १० जण अडकले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामन दल घटनास्थळी दाखल झाले. स्लॅबखाली अडकलेल्या सर्वांना बाहेर काढण्यात आले. यात पाच कामगारांचा मृत्यू तर पाच जण जखमी झाले आहे. जखमी कामगारांना ससून रुग्णालयात नेहण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भागवतांकडून भाजपाची पाठराखण

News Desk

कृष्णकुंज वर ठाकरे आणि पाटलांची ग्रेट भेट !

News Desk

भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट

News Desk