HW News Marathi
महाराष्ट्र

दोन वर्षे विद्यार्थीनीचा विनयभंग करणारा अटकेत

औरंगाबाद – तब्बल दोन वर्षांपासून शाळेतील विद्यार्थीनींशी अश्लील चाळे करणाऱ्या नराधम शिक्षकाला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विलास विश्राम काकडे (३६, रा. भोईवाडा) असे या विकृत शिक्षकाचे नाव असून जवाहरनगर ठाण्यात त्याच्याविरुद्ध विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर लगेचच त्याची शाळेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

पोदार सीबीएसई स्कूलमधील विद्यार्थीनींशी काकडे दोन वर्षापासून लगट करण्याचा प्रयत्न करीत होता. शिक्षकाच्या विकृत जाचाला कंटाळलेल्या विद्यार्थिनींनी पालकांना हा प्रकार सांगितल्यानंतर संतप्त पालकांनी गुरुवारी दुपारी प्राचार्यांना घेराव घातला.

काकडे पोदार हायस्कूलमध्ये गणित विषय शिकवतो. आठवी-नववीच्या विद्यार्थिनींसोबत काही ना काही कारण काढून तो जवळीक करण्याचा प्रयत्न करीत असे, शालेय प्रशासनाकडे याविषयी अनेकदा तक्रार देऊनही त्याच्यावर काहीच कारवाई न करता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले, अशी तक्रार पालकांनी केली.

काकडे दोन वर्षांपूर्वी पोदार शाळेत रुजू झाला. विद्यार्थिनींना त्यांच्या खासगी गोष्टी विचारणे, त्यांना शाळेबाहेर भेटण्यास सांगणे, पालकांच्या मालमत्तेबद्दल विचारणे, मुलींच्या स्वच्छतागृहाबाहेर घुटमळणे, लैंगिक चर्चा करण्यास त्यांना उद्युक्त करणे, त्यांच्या इच्छेविरुद्ध स्पर्श करणे, वाईट नजरेने बघणे असे विकृत प्रकार तो करीत असे, प्रसंगी गुण कमी देण्याचे अथवा नापास करण्याची धमकी देऊन विद्यार्थिनींवर दबाव टाकत असे. शाळेतील अनेक विद्यार्थिनींना दररोज या छळाला सामोरे जावे लागे; परंतु भीतीपोटी त्या घरी सांगत नसत. एका विद्यार्थिनीने हिंमत करून दोन दिवसांपूर्वी तिच्या काकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर याला वाचा फुटली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दानवे विरोधात शिवसैनिकांनी केले ” जोडे मारो आंदोलन “

News Desk

अखिल भारतीय साहित्य संमेलनाला आणखी निधीची आवश्यकता, योगदानासाठी पुढे यावे !

News Desk

बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड ?

News Desk