मुंबई | हिंगणघाटमध्ये पेट्रोल टाकून एका प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर औरंगाबादमध्ये बिअर बार चालकाने घरात घुसून महिलेला जिवंत जाळले. यात पीडित महिलेचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हदरुन केला आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी महिलांवरील वाढत्या आत्याचाराच्या घटनावर त्यांनी ट्वीट करत म्हटले की, “हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांचे खरे स्वप्नं आता जामिनीवर येऊन पूर्ण करा,” असे ट्वीट करत अमृत फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस सरकारच्या ‘मनोधैर्य’ ह्या ‘acid attack victors’ सठी असलेल्या योजनेतील सवलती अंकिता ला देण्यात याव्या अणि महिला आयोग अध्यक्षाचे पद लवकर भारण्यात यावे- माननीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांचे खरे स्वप्नं आता जामिनीवर येऊन पूर्ण करा @OfficeofUT
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) February 6, 2020
अमृता फडणवीस ट्वीटमध्ये म्हणले की, “देवेंद्र फडणवीस सरकारच्या ‘मनोधैर्य’ ह्या ‘acid attack victors’ सठी असलेल्या योजनेतील सवलती अंकिता ला देण्यात याव्या अणि महिला आयोग अध्यक्षाचे पद लवकर भारण्यात यावे- माननीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांचे खरे स्वप्नं आता जामिनीवर येऊन पूर्ण करा.” “महाराष्ट्रात गेल्या २ महिन्यात ४ acid attack च्य दुर्देवी घटना घडलेल्या अहेत!नागपुर मधे हिंगणघाट येथे पेट्रोल टाकून प्रोफेसर अंकिता ला जाळण्याचा प्रयत्न,औरंगाबाद मधील बलात्काराचे प्रकरण-ऐकून त्रास होतो!आपल्यातील भांडणे विसरुन-सुरक्षितते विषयी कठोर निर्णय घेणे आवश्यक,” मुख्यमंत्र्यांना ट्विटर हँडलला टॅगही केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.