HW News Marathi
Covid-19

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन,  उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई | राज्याचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आज (५ ऑगस्ट) पहाटे पुण्यात निधन झाले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. दोनच दिवसांपूर्वी ते कोरोनामुक्त झाले. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, पुन्हा त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर आज आलेल्या त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. आज सकाळी त्यांचे पार्थिव पुण्याहून निलंग्या नेण्यात येणार आहे. निलंग्यातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. दरम्यान, शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

“राज्याचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणार महत्त्वाचे नेतृत्व आपण गमावले आहे”, अशा शब्दात अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. “शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचे नेतृत्व हे संघर्षातून निर्माण झाले होते. जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी संघर्ष केला. सामाजिक, वैचारिक बांधिलकी जपणारे निष्ठावान नेतृत्व म्हणून ते सदैव स्मरणात राहतील. आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत”, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्र सरकारच्या विशेष पथकाने केले वरळी कोळीवाड्याचे विशेष कौतुक

News Desk

देशात पहिल्यांदाच एका दिवसात ४ लाखांपेक्षा अधिक रूग्णांची नोंद

News Desk

खुर्चीत बसून गांजा पित बोलणे सोपे आहे; किशोरी पेडणेकरांचा विरोधकांना टोला

Aprna