HW News Marathi
महाराष्ट्र

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज विशेष पीएमएलए कोर्टाने फेटाळला

मुंबई | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा डिफॉल्ट जामीन अर्ज विशेष पीएमएलए न्यायालयाकडून फेटाळून लावला आहे. देशमुखांना १०० कोटी रुपयांच्या कथित वसुलीच्या आरोपवरून त्यांना अटक केली असून ते सध्या तुरुंगात आहेत. देशमुखांवर कथित वसुली प्रकरणी त्यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी विशेष पीएमएलए न्यायालयात त्यांनी आज (१८ जानेवारी) सुनावणी पार पडली. 

मुंबईमधील बार आणि रेस्टॉरन्ट्सकडून दर महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्यात यावे, अशा आदेश देशमुखांनी दिला होता. या वसुलीची जबाबदारी देशमुखांनी सचिन वाझेंवर सोपवली होती, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्राद्वारे केला होता. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. यानंतर देशमुखांना गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

 या प्रकरणाची दखल सीबीआय आणि ईडी घेऊन देशमुखांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. यानंतर ईडीने देशमुखांना ५ वेळा समन्स बजावूनही चौकशीसाठी हजर न राहिल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर मार्ग अवलंबण्यात आला. दरम्यान, देशमुख हे त्यावेळी अज्ञातवासात गेले होते. यानंतर काही दिवसांपूर्वी देशमुख मुंबईमधील ईडीच्या कार्यालयात हजर झाले होत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राजकीय कारकीर्द आणि बरचं काही….

News Desk

एकाचा मुदडा पाडून लुटला पेट्रोलपंप

News Desk

दिवाळीनंतरच महाविद्यालयं सुरु करण्याचा विचार – उदय सामंत

News Desk