HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या प्रकरणात आणखीनच वाढ!

पुणे। माजी वनमंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वी उधाण आलं होतं, मात्र आता संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे दिसतात, मात्र ज्या ऑडिओ क्लिप्समुळे संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला त्याच ऑडिओ क्लिप्समुळे त्यांचा पाय अजून खोलात गेला आहे. एका तरुणीशी संवाद साधणारा ऑडिओ क्लिपमधील जो आवाज आहे, तो आवाज दुसरा-तिसरा कुणाचा नसून शिवसेना नेते संजय राठोड यांचाच असल्याचा दावा केला जात आहे. आवाजाची पडताळणी करणाऱ्या फॉरेन्सिक रिपोर्टमधील ही माहिती पुण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. त्यामुळे राठोडांच्या मंत्रिपदाचं स्वप्न तर दूरच, उलट त्यांना अटक करण्याची मागणी होऊ लागली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोडांच्या अटकेसाठी रान उठवलं होतं.

फॉरेन्सिक रिपोर्ट

फॉरेन्सिकचा रिपोर्ट आता समोर आला असला, तरी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेले प्रश्न गंभीर आहेत. एका तरुणीचा मृत्यू, तरुणी आणि मंत्र्यामध्ये फोनवर झालेलं संभाषण या दोघांची कडी जुडते.जेव्हा हे प्रकरण समोर आलं, तेव्हा संजय राऊतांपासून सर्वच शिवसेना नेते चौकशीअंती बोलणं योग्य असल्याचं म्हणत होते. आता त्याच चौकशीतला एक टप्पा पूर्ण होऊनही शिवसेना नेते सावधच भूमिका घेत आहेत.

उद्धव ठाकरेंच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह

उशिरानं घेतलेल्या राजीनाम्यानं याआधीच उद्धव ठाकरेंच्या संयमी, सोज्वळ प्रतिमेला धक्का पोहोचला होता. आता फॉरेन्सिक रिपोर्टनंतर पुन्हा तीच दिरंगाई शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या प्रतिमेवर प्रश्न उपस्थित करण्याची शक्यता नाकारता येत नाही. संजय राऊतांपासून सर्वच शिवसेना नेते चौकशीअंती बोलणं योग्य असल्याचं म्हणत होते. आता त्याच चौकशीतला एक टप्पा पूर्ण होऊनही शिवसेना नेते सावधच भूमिका घेत आहेत.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील वानवडी परिसरातील महंमदवाडी परिसरात 7 फेब्रुवारी 2020 रोजी मूळच्या परळीतील 22 वर्षीय तरुणीने पहिल्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेनंतर मोबाईल संभाषणाच्या ऑडिओ क्लिप आणि आत्महत्या केलेल्या तरुणीचे तत्कालीन मंत्री संजय राठोड यांच्यासोबतचे फोटो व्हायलर झाले, आणि शेवटी राठोडांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आणि आत्ता त्या मोबाईल संभाषणाच्या ऑडिओ क्लिपमधील आवाज हा संजय राठोड यांचाच असल्याचा अहवाल पुणे पोलिसांना प्राप्त झाला आहे. न्याय वैद्यक प्रयोगशाळेने हा अहवाल पुणे पोलिसांना दिला आहे. पण यासगळ्या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांच्या तपासावरच शंका उपस्थित केली आहे

 

Related posts

महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून ३०० प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले

News Desk

“मनसेने लोकांमध्ये भीती व संभ्रम निर्माण होईल असे वक्तव्य करू नये”, मनसेच्या ‘त्या’ आरोपाला राष्ट्रवादीचे उत्तर  

News Desk

राष्ट्रपती राजवट लागू करण्याची सुरुवात गुजरातपासून !

News Desk