HW News Marathi
मनोरंजन

पुढच्या वर्षी लवकर या! बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात

मुंबई । गेल्या बाप्पाची दहा दिवस मनोभावे पूजाअर्चा केल्यावर आज (१२ सप्टेंबर) निरोप देण्यासाठी वेळ आली आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी राज्यभरात जय्यत तयारी केली आहे. मुंबई-पुणे-नाशिकसह राज्यभरात वाजत-गाजत बाप्पाला निरोप दिला जाईल. पहाटेपासूनच गणेश भक्तांसह ढोल-ताशांच्या पथकांमध्ये लगबग दिसून येत आहे. बाप्पाच्या निरोपाची तयारी मुंबईतील १२९ ठिकाणी ५ हजार ६३० सार्वजनिक आणि ३१ हजार ७२ घरगुती गणपतीचे विसर्जन होणार आहे.

मुंबईच्या समुद्रकिनारी स्थानिक पोलिसांच्या मदतीने जलतरणपटू, नौदलाची मदत घेऊन बोटी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. विसर्जनासाठी येणारे वाहन रेतीत अडकू नये म्हणून लोखंडी फळ्या लावण्यात आल्या आहेत. तर छोट्या गणेशमूर्तींसाठी ४५ जर्मन तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जना वेळी चौपाटीवर ६३६ जीवरक्षकांसह ६५ मोटार बोटींची व्यवस्था केली आहे. त्यासोबतच निर्माल्य कलश, विविध वाहने, नियंत्रण कक्ष, आरोग्य विभागाकडून प्रथोमोपचार कक्ष उभारण्यात आले आहेत.

लोकलच्या विशेष गाड्या

गणेश विसर्जनानंतर घरी परतण्याची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रवाशांच्या लोकलच्या विशेष गाड्या धावणार आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर या विशेष गाड्या असतील. सीएसएमटी ते कल्याण, सीएसएमटी ते पनवेल आणि चर्चगेट ते विरारदरम्यान विशेष लोकल फेऱ्या धावतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भूषण कुमार यांच्यावर केलेल्या खोट्या आरोपांबद्दल मी माफी मागते !

News Desk

आता वेब सिरीजवर सुद्धा सेन्सॉरशिपची नजर

swarit

अभिनेता संदीप कुलकर्णी करणार फटकेबाजी

swarit