Site icon HW News Marathi

भगतसिंह कोश्यारी आज देहरादूनकडे प्रस्थान करणार

मुंबई । महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन निवृत्त होत असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे गुरुवारी (१६ फेब्रुवारी) राजभवन येथे भावपूर्ण निरोप देण्यात आला.

यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, राकेश नैथानी, सहसचिव श्वेता सिंघल व प्राची जांभेकर तसेच इतर कर्मचाऱ्यांनी आपल्या भाषणातून राज्यपालांच्या कार्याचा गौरव केला.

राज्यपालांचे विशेष सचिव राकेश नैथानी यांना देखील निरोप देण्यात आला. आज ( १७ फेब्रुवारी) रोजी राज्यपाल कोश्यारी यांना नौदलातर्फे मानवंदना देण्यात येणार असून त्यानंतर ते देहरादूनकडे प्रस्थान करणार आहेत.

Exit mobile version