HW News Marathi
महाराष्ट्र

ग्रामपंचायतींना मिळणार ५० लाखांचे बक्षीस, विभागातही कोविडमुक्त गाव अभियान राबवणार : अजित पवार

पुणे | देशात आणि राज्यात कोरोनाला मात देण्यासाठी जिल्हा परिषद आणि भारतीय जैन संघटनेने जिल्ह्यात यशस्वीपणे राबविलेले कोविडमुक्त गाव अभियान उपयुक्त आहे. म्हणून याची अंबलबजावणी पुणे विभागातही करावी आणि अभियानाच्या माध्यमातून आपले गाव कोविडमुक्त करण्यासाठी ग्रामपंचायतीने सुद्धा या अभियानात सहभाव घ्यावा असं, आव्हान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. तसेच अभियान संपल्यानंतर ग्रामपंचायतींना बक्षीस दिलं जाणार आहे. पहिलं बक्षीस हे ५० लाख, दुसरं २५ लाख आणि तिसरं बक्षीस १५ लाखाचं देण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

मागील दोन वर्षांपासून आपण कोविड संकटाशी मुकाबला करीत आहोत. हे मानवजातीवर आलेले संकट असल्याने सर्वांनी मिळून ही लढाई लढावी लागेल. नागरिकांनाही या आजाराबाबत गांभीर्य लक्षात आले आहे. दोन वर्षात विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान झाले आहे. हे संकट टाळण्यासाठी ग्रामविकास विभागाच्यावतीने कोविडमुक्त गाव करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ‘बिजेएस’च्या सहकार्याने पुण्यातील काही गावात राबविलेला हा उपक्रम यशस्वी ठरल्याने तो राज्यस्तरावर राबविण्याबाबत मंत्रिमंडळातील इतर सदस्यांना कार्यक्रमाची माहिती देण्यात येईल, असे अजित पवार म्हणाले.

शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा परिषद आणि भारतीय जैन संघटनेतर्फे राबविण्यात येणाऱ्या कोविडमुक्त गाव अभियानाच्या जिल्हास्तरीय उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पवारांनी जिल्ह्यातील सरपंचांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्याचबरोबर त्यांनी असं देखील म्हटलं की कोणताही उपक्रम वैयक्तिक प्रयत्नाने यशस्वी होत नाही, त्याला यशस्वी करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असते. ग्रामीण भारताची सूत्र युवकांच्या हाती जात आहे. मात्र, त्यामध्ये महिलांची संख्या देखील लक्षणीय आहे. महिलांनी आणि युवकांनी निश्यय केल्यास यश मिळू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

जिल्ह्यातील ५५० गावांनी गाव कोविडमुक्त करण्यासाठी कृतीदलाची स्थापना केली आहे. त्यांना बिजेएसतर्फे ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व गावात ही मोहीम राबविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वक्फ मालमत्तेची माहिती द्या – प्रधान सचिव श्याम तागडे

News Desk

‘सामान्य माणसाचे डोळे उंदीर कुरतडतोय, तर शिवसेनेनं मुंबई महापालिकेलाच कुरतडलं’!

News Desk

आमोद्यात दहा मोरांचा मृत्यू, वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून घटनेचा पंचनामा

Aprna