HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

राष्ट्रपती राजवट लागू करण्याची सुरुवात गुजरातपासून !

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी ठाकरे सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट आणावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि भजाप नेते नारायण राणे यांनी काल (२५ मे)  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भेटदरम्यान केली होती. यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (२६ मे) पत्रकारांशी बोलताना म्हणाले,  ‘राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर गुजरातमधून सुरुवात झाली पाहिजे,’ असे मत त्यांनी मांडले.

संजय राऊत म्हणाले, ‘राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर गुजरातमधून सुरुवात झाली पाहिजे. गुजरातमधील उच्च न्यायालयाने कोरोना हाताळण्यासंबंधी निष्कर्ष काढला आहे, ते गंभीर आहे. सरकारी रुग्णालये अंधारी कोठड्या झाल्या आहेत. रुग्णालयांची स्मशाने झाली आहेत, असे गुजरातच्या न्यायालयाने सरकारचे कान टोचले आहेत. तेथील राज्यपांलनी मुख्यमंत्र्यांना बोलावून समज दिली पाहिजे आणि विरोधकांनीही मुख्यमंत्र्यांना जाब विचारला पाहिजे.

महाविकसाआघाडी सरकार पाच वर्ष पूर्ण करणार

‘ हे राज्य सर्वांचे आहे, राज्य संकटात असताना सर्वांनी एकत्र येणे गरजेचे, इतर राज्यात सर्वजण एकजुटीने लढत आहेत. पण, महाराष्ट्रात तसे घडताना दिसत नाही, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. ‘महाराष्ट्राचे सरकार, ठाकरे सरकार राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि इतर प्रमुख पक्ष यांच्या महाविकास आघाडीचे बनले आहे. महाविकसाआघाडी सरकार संपूर्ण ५ वर्षांचा कालखंड पार पाडणार असून पुढिल निवडणुकाही आम्ही एकत्रच लढणार आहोत.’ असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.

Related posts

पाकिस्‍तान भारताच्या विमानांसाठी हवाई हद्द बंद करणार ?

News Desk

फटाकेबंदीबाबत मी विचाराधीन आहे असं बोललोच नाही-रामदास कदम

News Desk

‘त्या’ महिलेला सचिन वाझे दरमहा 50 हजार रुपये द्यायचे!

News Desk