HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू होणार जिम, व्यायामशाळा आणि फिटनेस सेंटर्स

मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेल्या जिम आणि फिटनेस सेंटर्स अखेर उघडणार आहेत. २५ ऑक्टोबरपासून म्हणजे दसऱ्यापासून राज्यात जिम, व्यायामशाळा आणि फिटनेस सेंटर्स उघडण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक नियम आणि उपायांचे सक्तीचे पालन करूनच जिम, व्यायमशाळा आणि फिटनेस सेंटर उघडण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे सांगतानाच झुम्बा, स्टिम आणि सौना बाथ सुरू करण्यास परवानगी नाकारण्यात येत असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.

परवानगी देत असतानाच एसओपीचे काटेकोरपण पालन करण्याचे उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आज जीम, फिटनेस सेंटर आणि व्यायाम शाळेंच्या प्रतिनिधींशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. जीम, व्यायामशाळांना परवागनी मिळावी, यासाठी या संघटनेच्या प्रतिनिधींनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची सुद्धा भेट घेतली होती.

‘एसओपी’नुसारच दसऱ्यापासून जिम, फिटनेस सेंटर्स, व्यायामशाळा चालणार

आरोग्य विभाग, वैद्यकीय तज्ज्ञ आणि जिम, फिटनेस सेंटर्स, व्यायामशाळांचे चालक यांनी तयार केलेल्या ‘एसओपी’चे पालन करूनच दसऱ्यापासून जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा सुरू करता येणार आहेत. हे नियम तपशीलाने आणि नेमकेपणाने तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये व्यायामासाठी येणाऱ्या सदस्यांना या ‘एसओपी’ची पूर्णपणे माहिती देणे अपेक्षीत आहे. व्यायाम शाळेच्या वेळा, तसेच मर्यादित संख्येत प्रवेश देणे. प्रशिक्षक, अन्य व्यवस्थापकीय अधिकारी यांची वारंवार आरोग्य तपासणी तसेच स्वच्छतेच्या बाबी यासाठी तपशीलाने नियमावली तयार करण्यात आली आहे.

व्यायामशाळेत प्रवेश करण्यापासून ते व्यायाम करताना कोण-कोणती काळजी घ्यावे याचे नियम आहेत. शारिरीक अंतर, हातांची स्वच्छता आणि मास्क वापरणे या नियमित गोष्टी बरोबरच, क्षेत्रफळांनुसार जास्तीत जास्त सुरक्षित शारिरिक अंतर राखणे. व्यायामशाळेचे दर तासाला निर्जंतुकीकरण करणे. उपकरणांमध्ये अंतर ठेवणे, वापरानंतर त्यांचे निर्जंतुकीकरण करणे. दररोज रात्री जिम,व्यायामशाळा बंद झाल्यानंतर पुर्णपणे निर्जंतुकीकरण करावे लागणार आहे.

 

 

Related posts

राजेंद्र दर्डा यांचा काँग्रेसच्या प्रसारमाध्यम-संपर्क कमिटीच्या चेअरमन पदाचा राजीनामा

News Desk

अयोध्येतील ३० एकर जमिनीवर भव्य बौद्धविहार बांधणार | आठवले

News Desk

“अंगावर याल तर शिंगावर घेऊच” दादरच्या भाजप-सेना राड्यावर महापौरांची प्रतिक्रिया

News Desk