Site icon HW News Marathi

साताऱ्यातील हाफ हिल मेरेथॉनमध्ये एका धावपटूचा मृत्यू

मुंबई | साताऱ्यातील (Satara) हाफ हिल मेरेथॉन (Half Hill Marathon) स्पर्धेचे आज आयोजन करण्यात आले होते. ही मॅरेथॉन स्पर्धा आज (18 सप्टेंबर) सकाळी 6.30 वाजता सुरू झाली. या मॅरेथॉनमध्ये धावताना एका तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हा तरुण कोल्हापूरातील मार्केट यार्ड परिसरातील राहणारा राज क्रांतीलाल पटेल या 32 वर्षी तरुणाचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या स्पर्धकाला सातारा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, रुग्णालयातून नेहण्याआधीच धावपटूचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, या धावपटुला रुग्णालयात दाखल केल्यानंतर मॅरेथॉन आयोजक आणि पोलीस देखील दाखल झाले होते. या धावपटुचे शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजले. राज पटेल यांच्या मृत्यू झाला या घटनेनंतर धावपटूकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. या बरोबरच इतर 3 स्पर्धक जखमी झाली आणि त्यांना ही खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने ही मॅरेथॉन आयोजित केली जाते. या मॅरेथॉनसाठी देशभरासह परदेशातून हौशी धावपटू येत असतात. ही मॅरेथॉन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही मॅरेथॉन पार पडते. यंदाच्या वर्षी एका धावपटूच्या मृत्यूने या मॅरेथॉनला गालबोट लागले आहे. या घटनेनंतर ही मॅरेथॉन नियोजनबद्ध आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सातारा रनर्स फौंडेशनच्यावतीने स्पर्धेच्या मार्गावर स्पर्धकांना पाणी,औषधे, बिस्कीटे, वेदनाशामक स्प्रे, कुलिंग स्टेशन इत्यादीची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

 

 

Exit mobile version