HW News Marathi
महाराष्ट्र

खासदार अमोल कोल्हेंनी अमित शाहांना दिल्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा!

मुंबई। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज ५७ वर्षांचे झाले आहेत. गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा आज वाढदिवस आहे. आणि त्यांच्या या वाढदिवसानिमित्ताने सगळ्यात राजकीय नेत्यांनी शुभेच्छा दिल्यात, अमित शाह यांना विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. त्याप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना दिलेल्या शुभेच्छा सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे.

अमित शाह यांना टीकात्मक शब्दांत वाढदिवसाच्या शुभेच्छा

शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी अमित शाह यांच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. आणि हे ट्वीट मात्र आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. अमोल कोल्हे यांनी ट्वीट केलेला हा व्हिडिओ हिंदी भाषेत आहे. त्याद्वारे त्यांनी अमित शाह यांना टीकात्मक शब्दांत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अमोल कोल्हे याचं ट्विट

माननीय केंद्रीय गृहमंत्री श्रीयुत अमितभाई शहा, आपको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं | पेट्रोल डिझेल के दामों की तरह आप अपने आयु की शतकपूर्ती करें, खाद्यतेलों के दाम जिस तरह लगातार बढ रहे हैं उसी तरह आपके कर्तृत्व का आलेख भी बढता रहे,

केंद्र सरकारवर अमोल कोल्हे यांचा घणाघात

दिवसेंदिवस इंधन तेलाच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर ३५-३५ पैशांनी वाढवले ​​आहेत. त्यानंतर अमित शाह यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा देशातील इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर शरसंधान साधल आहे.

शरद पवार यांना पंतप्रधान तर अजित पवारांना मुख्यमंत्री

खासदार अमोल कोल्हे सभा गाजविणारे वक्ते नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. कुठलाही मुलाहिजा न बाळगता आपल्या मनातील भावना ते व्यक्त करत असतात. अनेकवेळा राजकीय फटकेबाजीच्या माध्यमातून ते विरोधकांवर तसंच स्वपक्षीयांनाही डोस पाजत असतात. भोसरीमध्ये बोलताना त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. शरद पवार यांना पंतप्रधान तर अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागणं गरजेचं आहे. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालण्याची गरज त्यांना पडणार नाही, असं काम राष्ट्रवादीच्या नेते कार्यकर्त्यांनी करायला हवं, अशी अपेक्षा केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ST कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर यावे, नाहीतर होणार कारवाई! – अनिल परब

Aprna

पिंजऱ्यातून हात धुवा आणि अंतर ठेवा या पलीकडे मुख्यमंत्र्यांना काही सांगता येत नाही – नारायण राणे

News Desk

चांदोली अभयारण्यग्रस्त प्रकल्पग्रस्तांना ४ कोटी १९ लाख रुपयांचा रखडलेला उदरनिर्वाह त्याचे वाटप

News Desk