HW News Marathi
महाराष्ट्र

“…नाहीतर भाजप खासदारांना ठोकणार”, हर्षवर्धन जाधवांचा थेट इशारा

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याचा निर्णय दिला. यानंतर राज्य सरकारवर विरोधी पक्षाने टीकेची तोफ डागली. तसेच, मराठा समाजही मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला. मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. यावरुनच माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भाजपला इशारा दिला आहे. भाजप खासदारांनी मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा अन्यथा त्यांना ठोकणार असा रोखठोक इशारा माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिला आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळालं, त्यावेळीचं हे आरक्षण टिकणार नसल्याचं मी म्हणालो होतो. त्यामुळे आता जर मराठा समाजाला आरक्षण हवे असेल तर, त्यासाठी केंद्र सरकारलाच कायदा करावे लागणार आहे. त्यामुळे भाजपच्या खासदारांनी केंद्राकडे यासाठी मागणी करावी, अन्यथा त्यांना हे महागात पडेल असही जाधव म्हणाले आहेत.

कोर्टाने काय म्हटलं?

घटनापीठाने मराठा आरक्षणावर अत्यंत महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहे. आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा अधिक वाढवता येणार नाही. आणीबाणीची स्थिती सांगून आरक्षणाची मर्यादा वाढवली होती. हे नियमांचं उल्लंघन होतं. परंतु परिस्थिती तशी नव्हती, असं घटनापीठाने म्हटलं आहे. 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण का द्यावं? याबाबत गायकवाड समितीनेही काहीच स्पष्ट केलं नव्हतं. गायकवाड समितीच्या अहवालात त्याबाबतचा निष्कर्ष काढण्यात आलेला नव्हता, असं जस्टीस अशोक भूषण यांनी म्हटलं आहे.

मराठा समाजाला आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास ठरवण्यात आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने समानतेच्या तत्त्वाचं उल्लंघन केलं आहे. मात्र, या निर्णयामुळे वैद्यकीय प्रवेशातील आरक्षणावर काहीही परिणाम होणार नाही, असंही कोर्टाने नमूद केलं आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिलं होतं. त्यामुळे राज्यातील आरक्षणाची मर्यादा 68 टक्क्यांवर गेली होती.

  1. या आरक्षणाला कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. त्याची सुनावणी जस्टीस अशोक भूषण, एल. नागेश्वरा राव, एस. अब्दूल नाझीर, हेमंत गुप्ता आणि एस. रवींद्र भट या पाच न्यायामूर्तींच्या घटनापीठाकडे या प्रकरणाची सुनावणी झाली. 26 मार्च रोजी कोर्टाने यावरील सुनावणी राखून ठेवली होती. आत त्यावर निर्णय देण्यात आला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांची उंची मोदी आणि सह्याद्रीपेक्षा जास्त म्हणून ते मुख्यमंत्री झाले नाहीत,राऊतांची टोलेबाजी

News Desk

वीज कामगारांचे प्रश्न मार्गी लागणार, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले वीज कर्मचारी संघटनांना आश्वासन

News Desk

फोन टॅपिंगचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर, अनेकांचे बिंग फुटणार – देवेंद्र फडणवीस

News Desk