HW News Marathi
महाराष्ट्र

चंद्रकांत पाटील को गुस्सा क्यू आता है? हसन मुश्रीफ म्हणतात…

कोल्हापूर | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यात कायमच वादावादी सुरू असतेच. आता पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना सुनावलं आहे. अशोक चव्हाण यांची औकात काढण्याची भाषा करणे हे चुकीचे आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारची बाजू मांडत आहेत त्याचा चंद्रकांत पाटलांना गुस्सा क्यू आता हे अशा शब्दात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी टोला लगावला आहे

पुढे मुश्रीफ म्हणाले की, १०२ व्या घटनादुरुस्ती नंतर कायदा करण्याचा अधिकार राज्याचा नाही. सुप्रीम कोर्टाने गायकवाड समितीचा अहवाल फेटाळला आहे. घटनादुरुस्ती झाल्यानंतर मागास आयोग समिती नेमली असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत. त्यांना कायदा चांगला कळतो, केंद्र सरकारनेच यावर मार्ग काढायचा आहे. सरकारने काय भूमिका घ्यावी हे त्यांना चांगले माहिती आहे.असेही मुश्रीफ म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

मराठा आरक्षण कायद्यातील काय कळतंय? ते काहीही चुकीची माहिती देत असतात, या सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अशोक चव्हाणांनी औकातीत राहावं, असा दमच चंद्रकांत पाटलांनी भरला होता.

माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. अशोक चव्हाणांनी केंद्र सरकारवर बोट दाखवू नये. त्यांनी स्वत: राज्यासाठी काही तरी करून दाखवावं. चव्हाणांनी औकातीत राहावे. त्यांची औकात काय आहे हे आम्हाला माहीत आहे. आम्ही काय करावं ते आम्हाला सांगू नये, असं पाटील म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाताळ अन् नवीन वर्षासाठी राज्य सरकारकडून नवे निर्बंध

Aprna

सिंधुदुर्गात जमावबंदी असतांना नारायण राणें जन आशीर्वाद यात्रा सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार!

News Desk

औरंगाबाद बलात्कार प्रकरणातील आरोपीला तातडीने अटक करा, भाजप उपाध्याक्ष चित्रा वाघ यांची मागणी

News Desk