HW News Marathi
महाराष्ट्र

दूध आंदोलनासाठी काढलेला भाजपचा मुहूर्त चुकला – हसन मुश्रीफ

कोल्हापूर | देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर टीका करण्याचा सपाटा सुरू ठेवला आहेच. मात्र, त्यांना आघाडी सरकारकडून प्रत्युत्तर देखील येत आहे. ‘सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस यांचे सर्व मुहूर्त चुकत असल्याची खोचक टीका राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज (१ ऑगस्ट) कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, भाजपचे दूध दरासाठीचे आंदोलन योग्यही असेल. दुधाला दर मिळालाच पाहिजे. परंतु, आंदोलनासाठी त्यांनी काढलेला मुहूर्त चुकीचा आहे. शासकीय सुट्टीच्या दिवशी व बकरी ईद असताना आंदोलन पुकारले आहे, अशा परिस्थिती त्यांच्याकडे कोण लक्ष देणार?, असा सवाल मुश्रीफ यांनी उपस्थित केला.

तसेच सत्तेवरुन पायउतार झाल्यापासून देवेंद्र फडणवीस यांना काय झालंय हे कळत नाही. त्यांनी काढलेला मुहुर्त नेहमीच चुकीचा ठरत आहे. चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी अभिष्टचिंतन करण्याचे सोडून फडणवीसांनी भाजप कार्यकारिणी बैठक घेत त्यांना अपशकून केला, असे हसन मुश्रीफ यांनी याआधी देखील म्हटले होते. त्यामुळे आता भाजप यावर काय प्रतिक्रिया देणार, काय पलटवार करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“उदय सामंत, शंकरराव गडाख, अब्दुल सत्तार हे १९६६ पासूनचे शिवसैनिक आहेत काय?”

News Desk

“खुश रहे तुम सदा ये दुवा है मेरी”, मुनगंटीवारांची भावनिक प्रतिक्रिया

News Desk

अस्वस्थ ‘कॉर्पोरेट’ लॉबीने काँग्रेस पक्ष गांधीमुक्त करण्याचा विडा उचललाय !

News Desk