Site icon HW News Marathi

सलग दुसऱ्या दिवशी हिंगोली जिल्ह्याला पावसाने झोडपले

शिवशंकर निरगुडे | दोन दिवसाच्या उघडीप नंतर हिंगोली (Hingoli) जिल्ह्याभरात पावसाने पुन्हा रिपरिप सुरू केली. हा पाऊस दुसऱ्यादिवशी काल (8 ऑगस्ट) आणि आज (9 ऑगस्ट)  कोसळल्याने नदी, नाल्या काठचे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सेनगाव तालुक्यातील साखरा मंडळात मागील चोवीस तासात सर्वाधिक 95.3 मिली मीटर पावसाची नोंद झाली.

पाऊस मागील वीस ते पंचवीस दिवसांपासून जिल्हावासियांची पाठ सोडत नाही. परिणामी, खरिपाच्या पिकांची वाढ सुटली आहे. त्याच बरोबर सततच्या पावसामुळे अंतर्गत मशागत करता आली नसल्याने पिकांपेक्षा तन अधिक वाढले आहे. त्यामुळे खरीप हातचा जाण्याची भीती वक्त आहे.

मध्यंतरी दोन ते तीन दिवस पावसाने उघडीप दिली. परंतु ढगाळ वातावरण कायम होते. त्यातच 7 ऑगस्ट रोजी अतिवृष्ठी सदृश पाऊस कोसळला. दुसऱ्या दिवशी सोमवारीही पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू होती. या पावसामुळे शेती कामे टप्प झाली असून, बाजारपेठेवरही परिणाम होतो असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

साखरा मंडळात सर्वाधिक 95.2मिमी पाऊस…!

जिल्ह्यात मागील चोवीस तासात जोरदार पाऊस कोसळला. सेनगाव तालुक्यातील साखरा मंडळात 95.3मिमी पाऊस कोसळला. पुराचे पाणी शेतात शिरल्यामुळे पिके जमिनी सह रखडली. त्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरी 679 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मंडळनिहाय पाऊस मि .मी .मध्ये

हिंगोली 66.0 नरसी नामदेव 61.8 सिरसम 33.0 बासबा .20.5 डिग्रस कऱ्हाळे 39.3 माळ हिवरा 45.0 खांबाला 77.3 कळमनुरी 20.0 वाकोडी 31.5 नंादापूर 29.0आखाडा बाळापूर 21.डोंगरकडा 21.8 वारंगा 23.3 वसमत 37 आंबा .11.हयातनगर .32.8 गिरगाव 21.8 हट्टा 54.3 टेंभूनि .39.8 कुरुंदा.21.5 औंढा नागनाथ 27.8 येलेगाव 39.3 साळना 27.8 जवळा बाजार 12.सेनगाव 84.8 गोरेगाव 36.8.आजेगाव 62.पानकनेरगाव 48. हत्ता 37.व सेनगाव तालुक्यातील साखरा मंडळात ढग फुटी सदृश पाऊस झाला 95.3.मी .मीटर मधे सर्वाधिक जास्त पाऊस साखरा मंडळात पडला आहे

Exit mobile version