HW News Marathi
महाराष्ट्र

महिलांवरील अत्याचारासह सायबर क्राईम आमचे सर्वोच्च प्राधान्य – हेमंत नगराळे

मुंबई | मुंबई पोलिसांनी मागील वर्ष म्हणजेच 2021 या वर्षासाठीची ‘वार्षिक गुन्हेगारी परिषद’ मंगळवारी घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनी 2021 मध्ये घडलेल्या शहरातील गुन्ह्यांच्या प्रमाणाची माहिती दिली. तसेच मुंबई पोलिसांच्या कामगिरीविषयी सुद्धा त्यांनी यावेळी माहिती दिली.

जाहीर गुन्हेगारी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण आकडेवारी जनतेसमोर मांडण्याची ही मुंबई पोलिसांची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे पोलिसांचं हे पारदर्शकतेच्या दिशेने नवं पाऊल असल्याचं दिसून येत आहे. याआधी देखील ही आकडेवारी येत होती. परंतु, ती अंतर्गत वापरासाठी होती. मात्र, आता थेट सर्वसामान्यांपर्यंत या संदर्भात माहिती पोहोचवण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. त्यामुळेच ही पत्रकार परिषद महत्त्वपूर्ण ठरली.

दरम्यान, या पत्रकार परिषदेत देण्यात आलेल्या माहितीनुसार, 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये सर्व प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. 2021 मध्ये मुंबईत गुन्हेगारी प्रकरणांमध्ये 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबई पोलिसांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार शहरात 2021 मध्ये एकूण 64 हजार 656 गुन्हे दाखल झाले होते. तर यापूर्वी 2020 मध्ये एकूण 51 हजार 068 नोंद झाली होती, अशी आकडेवारी हेमंत नागराळेंनी वार्षिक परिषदेत मांडली आहे.

2020 च्या तुलनेत 2021 मध्ये महिला आणि लहान मुलांवरील गुन्ह्यांमध्ये 21 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष बाब म्हणजे अल्पवयीन मुलांवरील लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये 59 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2021 मध्ये अशा 6 हजार 038 प्रकरणांची नोंद झाली आहे. तर 2020 मध्ये 5 हजार 027 प्रकरणे नोंदवली गेली होती.

या पार्श्वभूमीवर बोलताना हेमंत नागराळे म्हणाले, “लहान मुले व महिलांवरील गुन्ह्यांना आळा घालणे यासाठी सायबर क्राईम हे आमचे सर्वोच्च प्राधान्य होते. त्यामुळे आता सर्व 94 शहर पोलीस ठाण्यांमध्ये खास ‘निर्भया’ पथके तयार करण्यात आली आहेत. यातील 91 पोलिस ठाण्यांमध्ये 5 जणांचे एक निर्भया पथक तयार करण्यात आले आहे. यात एक पोलीस उपनिरीक्षक दर्जाची महिला अधिकारी, दोन महिला पोलीस शिपाई आणि दोन पुरुष शिपाई असे एकूण पाच जण या पथकात असतील. तसेच १०३ या क्रमांकावर फोन करून महिला तक्रार दाखल करू शकतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रस्त्यांची डागडुजी, नालेसफाई, आपत्ती व्यवस्थानातील सर्व मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करावेत! – एकनाथ शिंदे

Aprna

‘त्या’ महिलेला सचिन वाझे दरमहा 50 हजार रुपये द्यायचे!

News Desk

हिंगोलीच्या जाधव दांपत्याने केली विठ्ठलाची महापुजा

News Desk