HW News Marathi
महाराष्ट्र

हिंगणघाट जळीतकांड प्रकरण | पीडितेच्या उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत

वर्धा | हिंगणघाट येथील प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे. पीडित तरुणीला उपचारांचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. पीडित तरुणीला वाचविण्यासाठी सर्वोतपरी मतद करण्याचे आश्वास मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

तसेच पीडित मुलीच्या उपचारासाठी विख्यात नॅशनल बर्न्स स्पेशलिस्ट डॉ. केसवानी त्यांच्या टीम नागपूरला आज ( ४ फेब्रुवारी) सायंकाळी ६ वाजता रवाना होणार आहे. पीडित मुलीच्या उपचारासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. या डॉक्टरांच्या टीमसोबत गृहमंत्री देखील नागपूरला रवाना झाली आहे. या प्रकरणातील आरोपी विकी नगराळे याला अटक करण्यात आली असून त्याला ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

या घनेच्या निषेधार्थ हिंगणघाटमध्ये सर्वपक्षीयकडून आज बंदचे आवाहन केले आहे. या मोर्चात विद्यार्थी, स्थानिक नागरिक, राजकीय नेते मोर्चात सहभागी होत आहेत. मुलीच्या उपचारासाठी सरकारी मदतीची पीडित तरुणीच्या वडिलांनी केली आहे. लहान मुली, शालेय विद्यार्थिनींपासून महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकही ‘हिंगणघाट बंद’मध्ये सहभागी झाले होते. हिंगणघाटमध्ये पेट्रोल टाकून एका प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे. या प्रकरणी आरोपी विकी नगराळे याला अटक करण्यात आली असून त्याला 8 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

INX Media Case: पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

News Desk

“हमने तो जलने का हुनर भी तूफानों से सीखा है…”आनंद महिंद्रांचा आरोग्य सेवकांना शायरीतून सलाम!

News Desk

‘आम्ही १६२’ ! महाविकासआघाडीचे सर्व आमदारांची पहिल्यांदा ‘परेड’

News Desk